एरंडोल तालुक्यात अपघात : चारचाकी वाहनाच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

Accident in Erandol taluka: Biker killed after being hit by four-wheeler एरंडोल (21 जून 2025) : एरंडोल तालुक्यातील आडगावजवळ भरधाव चारचाकीने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत असलेला एक जण गंभीर जखमी झाला. हा अपघात गुरुवार, 19 जून रोजी दुपारी अडीच वाजता घडला. कासोदा पोलिसात चारचाकी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सत्यवान शामराव वडर (रा.कासोदा, ता.एरंडोल) असे मयताचे नाव आहे.
असा घडला अपघात
एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील सत्यवान वडर हे त्यांचा मित्र रवींद्र गुलाब लोंढे यांच्यासोबत गुरुवार, 19 जून रोजी दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास एरंडोल ते भडगाव रोडवरील आडगाव गावाजवळ दुचाकी (एम.एच.19 डी.डी.4541) ने जात असताना समोरून येणारी चारचाकी महिंद्रा मॅक्स कंपनीची गाडी (क्रमांक एम.एच.20 जी.सी. 3001) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत सत्यवान वडर हा जागीच ठार झाला तर त्याच्यासोबत मागे बसलेला रवींद्र लोंढे हा गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर जखमीला एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेवर संदर्भात माधवराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चारचाकी वाहनावरील चालक किशोर रामकिशन पाटेकर (24, रा.गारखेडा, जि.छत्रपती संभाजी नगर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहा.फौजदार किशोर पाटील करीत आहेत.
