नूपूर नृत्यांगणचे कथ्थक परीक्षेत यश

जळगाव (23 जून 2025) : गेल्याच वर्षापासून शहरात सुरू झालेल्या नुपुर नृत्यांगण ह्या कथ्थक क्लासच्या विद्यार्थिनींनी पहिल्या वर्षी घवघवीत यश प्राप्त केले आहे.
गुरु नूपुर चांदोरकर-खटावकर या नुकत्याच आफ्रिकेहून जळगावला आल्यानंतर त्यांनी नुपुर नृत्यांगण क्लास ची स्थापना केली. त्या डॉ. अपर्णा भट व शमाताई भाटे, पुणे यांच्या शिष्या असून त्यांनी ललित कला केंद्र, पुणे येथून कथ्थक मध्ये एम. ए. केले आहे. अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई आयोजित प्रवेशिका प्रथम परीक्षेस नूपूर नृत्यांगणात प्रशिक्षण घेणा-या कनिष्का कुलकर्णी, लावण्या कुलकर्णी, ओवी धानोरकर, अनघा कुलकर्णी.

चार विद्यार्थिनी प्रथम परिक्षेत बसल्या होत्या. यावर्षी त्यांची पहिलीच बॅच परीक्षेला बसली होती, आणि चारही विद्यार्थिनी डिस्टिंगशनने उत्तीर्ण झाल्या असून या मुलींचे सर्वत्र कौतुक होत आहे.