भडगावातील बॅटरी चोरटे 53 हजारांच्या मुद्देमालासह जाळ्यात

भडगाव (23 जून 2025) : भडगाव शहरातील बॅटरी चोरट्यांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींकडून 53 हजार रुपये किंमतीच्या बॅटर्या तसेच एक टी.व्ही.एस. कंपनीची दुचाकी जप्त
करण्यात आली. याबाबत भडगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसात दाखल होता गुन्हा
21 जून रोजी रात्री 10 ते 22 जून रोजी पहाटे 5 वाजेच्या दरम्यान नासीर खान रशीद खान (52, चालक, रा.ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) यांच्यासह इतर तक्रारदारांच्या गाडीतील बॅटर्या चोरीला गेल्याची तक्रार भडगाव पोलिसात दाखल होती. तपास एएसआय प्रदीप चौधरी यांच्याकडे होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या गोपनीय माहितीच्या आधारे चोरी केलेल्या गाड्यांच्या बॅटर्या भडगाव शहरातील समीर शेख कदीर शेख आणि शायब सैय्यद मुनव्वर (दोघे रा. ग्रीनपार्क कॉलनी, भडगाव) यांनी चोरल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
63 हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी समीर शेख आणि शायब सैय्यद यांना 22 जून रोजी अटक केल्यानंतर कोठडीत चौकशी केल्यानंतर त्यांनी ग्रीन पार्कजवळील शाळेतून चोरी केलेल्या बॅटरीसह इतर ठिकाणांहून चोरलेल्या बॅटर्या काढॅन दिल्या. विविध कंपनीच्या विविध गाड्यांच्या आणि ट्रॅक्टरच्या बॅटर्या तसेच एक काळ्या रंगाची टी.व्ही.एस. वेगो दुचाकी (क्र.एम.एच. 04 एफ.एक्स.1247) असा एकूण 63 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई भडगाव पोलिस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय प्रदीप चौधरी, हवालदार निलेश ब्राम्हणकार, कॉन्स्टेबल प्रवीण परदेशी, कॉन्स्टेबल अमजद पठाण, कॉन्स्टेबल सुनील राजपूत यांनी केली. तपास कॉन्स्टेबल प्रदीप चौधरी करीत आहेत.