जळगावातील सेवानिवृत्त परिचारीकेच्या खून प्रकरणातील 30 लाखांचा मुद्देमाल मयताच्या वारसांना परत


Property worth Rs 30 lakhs in the murder case of a retired nurse in Jalgaon returned to the deceased’s heirs जळगाव (23 जून 2025) : 30 लाखांच्या लालसेपोटी जळगावात सेवानिवृत्त परिचारीकेचा खून करण्यात आला होता. संशयीतांकडून तपासादरम्यान जप्त केलेले 30 लाख रुपये सोमवार, 23 जून रोजी दुपारी एक वाजता मयत महिलेच्या नातेवाईकांना जळगाव पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या उपस्थितीत परत देण्यात आले.

असे आहे नेमके प्रकरण
नाशिकच्या रहिवासी व सेवानिवृत्त परिचारीका असलेल्या स्नेहलता अनंत चुंबळे यांच्याजवळील 30 लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी 20 ऑगस्ट 2024 रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास संशयित आरोपी जिजाबराव अभिमन्यू पाटील (48, रा.अमळनेर,, मूळ रा.खडकीसीम, ता.चाळीसगाव) व विजय रंगराव निकम (46, रा.अमळनेर, मूळ रा.विचखेडा, ता.पारोळा) यांनी स्नेहलता चुंबळे यांचा खून केला आणि त्यांच्या प्रेताची कुठेतरी विल्हेवाट लावली. जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल होवून दोघांना अटक करण्यात आली. आरोपींकडून त्यावेळी 30 लाखांची रोकड जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी जळगावच्या जिल्हा परिषदेत नेमणुकीला होते. जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी फिर्यादी समीर उर्फ सौरभ संजय देशमुख आणि नातेवाईक संजय नानासाहेब देशमुख यांना ही रक्कम ताब्यात दिली.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !