गोजोर्यातील रहिवासी डॉ.सविता पाटील योगारत्न पुरस्काराने सन्मानीत

भुसावळ (24 जून 2025) : भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथील रहिवासी डॉ.सविता प्रवीण पाटील यांना योग आणि निसर्गोपचार क्षेत्रातील त्यांच्या कामगिरीच्या आधारे 22 जून 2025 रोजी संभाजीनगर येथे आयुष इंटरनॅशनल मेडिकल असोसिएशन आणि एजीएमए, इंडिया यांनी आयोजित केलेल्या योगरत्न पुरस्कार 2025 ने सन्मानित करण्यात आले.
डॉ.सविता यांनी 2014 आणि 2023 मध्ये अनुक्रमे उत्तराखंड संस्कृत विद्यापीठ, हरिद्वार आणि एसजीआरआर विद्यापीठ डेहराडून येथून योगशास्त्रात एमए आणि पीएचडी केली आहे. एसजीआरआर विद्यापीठ डेहराडून येथे योगशास्त्र क्षेत्रात त्यांना 10 वर्षांहून अधिक अध्यापन आणि संशोधनाचा अनुभव आहे.

त्या सध्या पुण्यात योग आणि निसर्गोपचार क्षेत्रात चांगल्या आरोग्यासाठी जागरूकता निर्माण करण्यासाठी कार्यरत आहेत. योग आणि निसर्गोपचार क्षेत्रात हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.