सरकारने पेन्शनर्सच्या समस्या सोडवून पेन्शनमध्ये करावी वाढ : मिठाराम सरोदे

Government should solve the problems of pensioners and increase pension : Mitharam Sarode भुसावळ (24 जून 2025) : सरकारने पेन्शनर्सच्या समस्यांचा सामोपचाराने विचार करून लवकरात-लवकर पेन्शन वाढ मंजूर करावी, असे प्रतिपादन तालुकाध्यक्ष मिठाराम सरोदे यांनी केले. ईपीएस -95 राष्ट्रीय संघर्ष समिती, भुसावळमार्फत 22 वर्धापन दिन कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत शहरात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
आंदोलनाची ठरली दिशा
राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण देशभरात ईपीएस 95 पेन्शन वाढीसाठी अहोरात्र लढा सुरू आहे. संघटनेने आजपर्यंत केलेल्या कामाचा लेखा-जोखा उत्तर महाराष्ट्र समितीचे उपाध्यक्ष खडसे यांनी मांडला. मान्यवरांनी येणार्या काळात करण्यात येणार्या आंदोलनाची दिशा ठरवली. बैठकीसाठी महाराष्ट्राचे उपसचिव व्यवहारे, जळगाव येथील पदाधिकारी भारंबे, सचिव डी.एन.पाटील, खजिनदार नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. भुसावळचे उपाध्यक्ष दिलीप किरंगे, खजिनदार अनिल जावळे, सचिव डी.जी.सुर्यवंशी, सहसचिव बी.व्ही.पवार, कोषाध्यक्ष सुरेश चौधरी, कार्याध्यक्ष देवकर तसेच समितीचे शेकडो सदस्य उपस्थित होते . . सूत्रसंचालन डी.जी.सूर्यवंशी यांनी केले.