वुमेन्स अॅण्ड चाईल्ड केअर प्लस संस्थेद्वारे मानेगावात वृक्षारोपण
जळगाव (25 जून 2025) : शहरातील वूमेन्स चाईल्ड केअर प्लस या संस्थेव्दारे मानेगाव येथे सरपंच, उप सरपंच यांच्या सहकार्याने वृक्षारोपण करण्यात आले. मुक्ताईनगर तालुक्यातील मानेगाव येथे मार्कंडेय ऋषिंच्या मठाजवळ हे वृक्षारोपण करण्यात आले. युवक आणि ग्रामस्थांनी झाडांच्या संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली आहे.
यांची होती उपस्थिती
वृक्षारोपणासाठी वुमेन्स अॅण्ड चाईल्ड केअर प्लस या संस्थेच्या अध्यक्ष शांता वाणी, कोषाध्यक्ष हेमलता कुलकर्णी, नंदा पाटील, शालिनी पाटील, निवेदिता ताठे, कल्पना बोरसे, संध्या वाणी, उर्मिला तांबट, मीना पाटील, मीना महाजन, मंगला सोनवणे, अलका पाटील आदींसह मानेगाव सरपंच लीना पाटील, संभाजी पाटील, उपसरपंच चेतना पाटील, माजी सरपंच रवींद्र पाटील, पं.स.च्या माजी सदस्य लतापाटील, पोलिस पाटील दिलीप पाटील, चंद्रकांत पाटील, प्रीती कोळी, सोनाली पाटील, शांताराम पाटील, भूषण पाटील, विठ्ठल पाटील, समाधान पाटील, रवींद्र पाटील, समाधान पांदे, आशा पाटील, शारदा पाटील, उज्वला पाटील, साक्षी पाटील, रितु पाटील, हर्षदा पाटील, पूर्वी पाटील आदी स्त्री-पुरुष उपस्थित होते.


विठ्ठल पाटील यांच्याकडे झालेल्या कार्यक्रमात सरपंच लिना पाटील यांनी शांता वाणी यांचा सत्कार केला तर संस्थेच्या सर्व सभासदांना गुलाब पुष्प देवून त्यांचाही सत्कार ग्रामस्थांतर्फे करण्यात आला. यावेळी संस्थेच्या कामाची माहिती शांता वाणी यांनी करुन दिली. सरपंच व विठ्ठल पाटील यांचा संस्थेतर्फे शाल गुलाब पुष्प देवून सत्कार करण्यात आला. यावेळी विठ्ठल पाटील यांनी गावातील एकी आणि कामकाजाची माहिती देवून झाडे जगविण्याची हमी दिली. हेमलता कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.






