शिक्षकाने शाळेतच उचलले टोकाचे पाऊल : पाचोरा शहरात खळबळ


Teacher takes extreme step in school : Excitement in Pachora city पाचोरा (25 2025) : पाचोरा शहरातील व्हीपी रोडवरील सुपडू भादू पाटील शाळेतील शिक्षक रवींद्र भारत महाले (45) यांनी शाळेच्या तिसर्‍या मजल्यावर गळफास घेतला. ही घटना बुधवारी समोर आली. या घटनेमुळे शाळेतील शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली. आत्महत्येचे कारण मात्र कळू शकले नाही.

पाचोरा पोलिस निरीक्षक अशोक पवार, सहायक पोलिस निरीक्षक निकुंभ, उपनिरीक्षक घायाळ, पोलिस हवालदार योगेश पाटील, कर्मचारी हरीश परदेशी, संतोष राजपूत आणि वाहनचालक संभाजी पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जय मल्हार चालक बबलू मराठे, किशोर लोहार आणि अमोल पाटील यांच्या मदतीने मृत शिक्षकाला गळफासाच्या अवस्थेतून खाली उतरवण्यात आले.









रवींद्र महाले यांनी शाळेच्या तिसर्‍या मजल्यावर, ते शिकवत असलेल्या वर्गासमोरील एका वर्गात आत्महत्या केल. त्यांचा मृतदेह तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी हलवण्यात आला.

या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून याबाबत पाचोरा पोलिस सखोल चौकशी करीत आहेत. एका लोकप्रिय शिक्षकाने अचानक हे टोकाचे पाऊल उचलल्याने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !