भुसावळातील भोळे महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी घेतली व्यसनमुक्त राहण्याची शपथ

दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त कार्यक्रम


Students at Bhole College in Bhusawal took an oath to remain drug-free भुसावळ (26 जून 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवसानिमित्त व्यसनमुक्त जीवन जगण्यासाठी शपथ घेण्यात आली. 26 जून हा दिवस दरवर्षी जगभरात अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थाची तस्करी आणि सेवन ही देशाला भेडसावणारी सर्वात गंभीर समस्या आहे. या विळख्यातून तरुणाईची सुटका करण्यासाठी व अंमली पदार्थामुळे होणार्‍या दुष्परिणामाबाबत जनजागृती करण्यासाठी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य आणि दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालय, भुसावळ यांच्या संयुक्त विद्यमाने भोळे महाविद्यालयात जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिवस’ म्हणून साजरा करण्यात आला. प्रसंगी आयोजित कार्यक्रमात व्यसनमुक्त जीवनाचे महत्त्व पटवून देत विद्यार्थ्यांना जागरूकतेची शपथ देण्यात आली.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते. प्रमुख वक्ते म्हणून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्यचे नाशिक विभागीय संघटक प्रमुख आणि भोळे महाविद्यालयाच्या भौतीकशास्त्र विभाग प्रमुख प्रा.डॉ.दयाघन राणे उपस्थित होते.









व्यसनांमुळे तरुणाई उद्ध्वस्त
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तरुणाईचे जीवन उध्वस्त होत आहे. आजची तरुण पिढी जर व्यसनांपासून दूर राहिली तरच आरोग्यपूर्ण समाज आणि सक्षम राष्ट्र घडू शकते. प्रत्येक विद्यार्थ्याने सामाजिक भान ठेवून व्यसनमुक्तीचा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरात पोहोचवावा, असे आवाहन त्यांनी केले.

विद्यार्थ्यांनी घेतली शपथ
कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन नशाबंदी मंडळ, महाराष्ट्र राज्याचे नाशिक विभागीय संघटक प्रमुख प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी केले. त्यांनी अमली पदार्थांच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकत सांगितले, नशा ही जीवनाला अंधारात घेऊन जाते. ती दूर ठेवण्यासाठी आपल्याला केवळ स्वतःपुरते नाही तर समाजासाठीही जागरूक राहावे लागते, असे ते म्हणाले. यानंतर उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनी आणि प्राध्यापक वर्ग तसेच कार्यालयीन कर्मचार्‍यांनी एकत्रितपणे व्यसनमुक्त भारत घडवण्यासाठी शपथ घेतली.

या कार्यक्रमात विद्यार्थ्यांना नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी पुरवलेल्या पोस्टर्स चे प्रदर्शन देण्यात आले. ज्यामुळे व्यसनमुक्तीचा संदेश विद्यार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यात यश आले.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाचे आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या तर्फे भोळे महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्रा.डॉ.संजय चौधरी यांचे विशेष सहकार्य लाभले. प्रसंगी सहायक विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.डॉ.अंजली पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.जगदीश चव्हाण, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.श्रेया चौधरी, प्रा.डॉ.गोविंद वाघुळदे, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.संजय बाविस्कर, प्रा.आर.डी.भोळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.एस.एस.पाटील, युवराज चौधरी, किरण पाटील, विजय पाटील, दीपक महाजन, प्रमोद नारखेडे, राजेश पाटील, सुधाकर चौधरी, प्रकाश सावळे, सुनील ठोसर, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होत्या. सूत्रसंचालन प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी तर प्रास्ताविक प्रा.डॉ.संजय चौधरी तसेच आभार प्रा.डॉ.अंजली पाटील यांनी मानले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !