नामंजूर नोंदी मंजूर : जळगाव जिल्हाधिकार्‍यांकडून चौकशीचे आदेश


Unapproved entries approved: Jalgaon District Collector orders inquiry भुसावळ (26 जून 2025) : भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे प्र.न. मंडळ अधिकारी यांनी वराडसीम, साकेगाव व गोंंभी शिवारातील गटांवरील नामंजूर नोंद मंजूर करून आपल्या पदाचा गैरवापर केल्याची तक्रार सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली होती. या तक्रार अर्जाची दखल घेत चौकशी आदेश उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.

असे आहे नेमके प्रकरण
याबाबत माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील कुर्‍हे प्र.न. येथील मंडळ अधिकारी प्रवीण लक्ष्मण पाटील यांनी पदाचा गैरवापर करून वराडसीम गट नं. 382 नामंजूर नोंद 9562 व मंजूर नोंद 9567, साकेगाव शिवारातील गट क्र. 298/1/1/ब/2 वरील नोंद क्र.31359 अगोदर नामंजूर केली व त्याच गटातील 31492 नोंद मंजूर केली. तसेच गोंभी शिवारातील गट नं. 23 वरील नोंद नं.1383 नामंजूर करून 1385 व 1407 या नोंद मंजूर केल्या, असा तक्रारी अर्ज दि. 9 जून 2025 रोजी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ते केदारनाथ सानप यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांना दिला होता.



या अर्जाची दखल प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश उपविभागीय अधिकारी भुसावळ यांना जिल्हाधिकारी कार्यालयातील महसुल विभागाचे तहसीलदार विजय सुर्यवंशी यांनी दिले आहेत. याबाबतचा अहवाल कार्यालयास सादर करावा, असे आदेशात नमूद आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !