दुचाकी व स्कूटरला टोल लागणार का ? परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी दिली ही माहिती

Will two-wheelers and scooters have to pay toll? Transport Minister Nitin Gadkari gave this information नवी दिल्ली (26 जून 2025) : राष्ट्रीय महामार्गावरून धावणार्या दुचाकींना आता 15 जुलैपासून कर भरावा लागेल या संदर्भात काही माध्यमांनी दावा केला होता मात्र महामार्गावर दुचाकी आणि स्कूटर चालकांना कोणत्याही प्रकारचा टोल कर भरावा लागणार नाही, अशी ग्वाही व स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दिले आहे.
मंत्री गडकरी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी स्पष्ट केले आहे की, अशा बातम्या पूर्णपणे खोट्या आणि चुकीच्या आहेत. दुचाकी चालकांना पूर्वीप्रमाणेच टोल करातून सूट मिळत राहील. पीआयबी फॅक्ट चेकच्या अधिकृत हँडलने देखील एक्सवर वर पोस्ट केले आहे आणि ही बातमी खोटी असल्याचे म्हटले आहे.

एनएचएआयने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, माध्यमांमध्ये असे वृत्त आले आहे की, भारत सरकार दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याचा विचार करत आहे. एनएचएआय स्पष्ट करू इच्छिते की, अशा कोणत्याही प्रस्तावावर चर्चा होत नाही. दुचाकी वाहनांवर टोल कर लादण्याची कोणतीही योजना नाही.
गेल्या काही दिवसांपासून अनेक न्यूज पोर्टल्स आणि सोशल मीडियावर असे वृत्त येत होते की, सरकार 15 जुलै 2025 पासून दुचाकी वाहनांवर टोल कर लादणार आहे. काहींनी असा दावाही केला होता की, दुचाकी आणि स्कूटर मालकांना फास्टॅग बसवावा लागेल आणि जर त्यांनी नियम मोडला तर त्यांना 2000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. काही वृत्तांत असे म्हटले होते की, दरमहा 150 रुपये टोल शुल्क भरावे लागेल. परंतु, या वृत्तांत कोणत्याही अधिकृत राजपत्र अधिसूचनेचा किंवा सरकारी निवेदनाचा उल्लेख नव्हता.
