मोहाडी पोलिसांची दमदार कामगिरी : जबरीने मोबाईल लूटणार्‍या मालेगावातील अट्टल चोरट्यांना बेड्या


Strong performance by Mohadi police : Malegaon’s persistent thieves who forcibly robbed mobile phones arrested धुळे (27 जून 2025) : मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल रेसीडेन्सी समोर दुचाकीस्वाराला अडवून त्याच्याकडील मोबाईल लूटणार्‍या मालेगावातील अट्टल आरोपींना धुळ्यातील मोहाडी पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींच्या अटकेनंतर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

दुचाकीस्वाराकडील मोबाईल हिसकावला
तक्रारदार हिरामण ताराचंद गायकवाड (49, चक्करबर्डी रोड, धुळे) हे 27 रोजी दुचाकीने सायंकाळी साडेसहा वाजता जात असताना हॉटेल रेसीडेन्सीसमोर पाठीमागून दुचाकीवरून आलेल्या ट्रीपलसीट टोळक्याने गायकवाड यांच्याकडील महागडा मोबाईल हिसकावून पोबारा केला होता. याप्रकरणी मोहाडी पोलिसात गुन्हा दाखल होता. हा गुन्हा संशयीत आरोपी समीर खान सलीम खान (21, प्लॉट नं.92, जाफर नगर, ऐलेहद्दीज मशीदजवळ, मालेगाव) व सैय्यद दाऊद सैय्यद इब्राहीम (19, प्लॉट नंबर एक, आदम नगर बाबा दुध डेअरी, मालेगाव) महेफुस (सुरत) यांनी केल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांची मदत घेत मालेगावातून समीर खान व सैय्यद दाऊद यास अटक करण्यात आली. आरोपींचा साथीदार पसार असून त्यांच्याकडून 20 हजार रुपये किंमतीचा मोबाईल जप्त करण्यात आला. तपास हवालदार पंकज एन.चव्हाण करीत आहेत.









यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार उपासे यांच्या मार्गदर्शनाखाली मोहाडी पोलिस निरीक्षक शिल्पा पाटील, चेतन मुंढे, पंकज एन.चव्हाण, नरेशकुमार चव्हण, मनीष सोनगीरे, मुकेश मोरे, प्रकाश जाधव, सुमित चव्हाण, चेतन झोळेकर, जितेंद्र सैंदाणे आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !