धुळे गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : लाखोंचे शेती साहित्य लांबवणार्‍या त्रिकूटाला बेड्या

चार गुन्ह्यांची उकल : आरोपींच्या पसार पसार साथीदारांचा कसून शोध


Dhule Crime Branch’s big achievement : Trio arrested for smuggling agricultural equipment worth lakhs धुळे (27 जून 2025) : शेती हंगाम सुरू असताना शेतकर्‍यांकडील ट्रॅक्टर, ट्रॉली, रोटावेटर आणि टँकर लांबवण्यात आल्यानंतर समांतर तपासात धुळे गुन्हे शाखेने त्रिकूटाला अटक केली आहे. आरोपींकडून 11 लाख 10 हजार रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले असून चार गुन्ह्यांची उकलही झाली आहे. आरोपींचे चार साथीदार पसार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

दोंडाईचा हद्दीतील गुन्ह्याची उकल
15 मे 2025 रोजी संध्याकाळी सहा ते 16 मे रोजीच्या पहाटे सहादरम्यान कर्ले, ता.शिंदखेडा गावातील जिल्हा परिषद शाळेजवळुन पाण्याचे टँकर लांबवल्याप्रकरणी दोंडाईचा पोलिसात गुन्हा दाखल होता. धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना या गुन्ह्यातील आरोपींची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर राहुल ऊर्फ गोलु गणपतसिंग गिरासे (26, रा.दराणे, ता.शिंदखेडा), प्रशांत ऊर्फ गोलु समाधान पाटील (25, निशाणे, ता.शिंदखेडा) व चेतन ऊर्फ बंटी योगेश पवार (19, दराणे, ता.शिंदखेडा) यांना दराणे येथून ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यांनी साथीदार अनिल भील (साळवे, ता.शिंदखेडा), कालू भील (पुर्ण नांव गाव माहित नाही), दादु ऊर्फ चोख्या कोळी (रा.साळवे, ता.शिंदखेडा) तसेच टँकर विकत घेणारा उमेश राजेंद्र पाटील (निशाणे, ता.शिंदखेडा) यांच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिल्यानंतर तिघांना अटक करण्यात आली.









चार गुन्ह्यांची उकल : लाखोंचे साहित्य जप्त
आरोपींच्या अटकेनंतर शिंदखेडा पोलिस ठाण्यातील दोन तर दोंडाईचा व सोनगीर पोलिस ठाण्यातील प्रत्येकी एक गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपींच्या ताब्यातून 50 हजार रुपये किंमतीचे टँकर, 40 हजार रुपये किंमतीची ट्रॉली, 40 हजार रुपये किंमतीचे रोटा व्हेटर, दोन लाख 80 हजार रुपये किंमतीचे ट्रॅक्टर तसेच गुन्हा करताना वापरलेले सात लाख रुपये किंमतीचे ट्रॅक्टर मिळून 11 लाख 10 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, पोलिस अंमलदार संजय पाटील, सचिन गोमसाळे, प्रशांत चौधरी, संतोष हिरे, सुरेश भालेराव, चेतन बोरसे, पंकज खैरमोडे, विनायक खैरनार, सुनील पाटील, हर्षल चौधरी, संजय सुरसे व कैलास महाजन आदींच्या पथकाने केली.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !