भुसावळात जनावरांनी अडवले रस्ते : पालिकेने करावी कारवाई : केदार सानप


Animals blocking roads in Bhusawal : Municipality should take action : Kedar Sanap भुसावळ (1 जुलै 2025) : भुसावळ शहरात मोकाट जनावरांचा त्रास होत असल्यामुळे तत्काळ कोंडवाडा बनविण्याबाबत सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी मुख्याधिकारी राजेंद्र फातले यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

रहदारीला निर्माण झाला अडथळा
निवेदनात म्हटले आहे की, भुसावळ शहरामध्ये मोकाट जनावरे रस्त्याच्या बाजुला व रोडवर येत असल्याने अपघात होत आहेत व रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे तत्काळ आपल्या स्तरावरून संबंधितांना योग्य ते आदेश देवून कोंडवाडा बनविण्यात यावा, अशी मागणी सामाजिक तथा माहीती अधिकार कार्यकर्ता केदारनाथ सानप यांनी केली आहे. झालेल्या कारवाईची एक प्रत माहितीस्तव मला देण्यात यावी, अशी विनंती त्यांनी केली आहे.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !