गं.भा.कमलाबाई राणे

डोंगरकठोरा, ता.यावल (2 जुलै 2025) : गावातील रहिवासी गं.भा.कमलाबाई नीलकंठ राणे यांचे वृद्धापकाळाने बुधवार, 2 जुलै रोजी पहाटे 1.45 वाजता निधन झाले. त्या जे.डी.सी.सी.बँकेचे क्षेत्रीय अधिकारी व विविध कार्यकारी सोसायटी डोंगरकठोराचे संचालक प्रभाकर नीलकंठ राणे यांच्या मातोश्री होत. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन सुना, नातू, पणतू असा परिवार आहे.