23 व्या वर्षी लेप्टनंट झालेल्या संकल्प चौधरीचा भुसावळातील ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये सन्मान


भुसावळ (2 जुलै 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मीडियम स्कूलमधील माजी विद्यार्थी संकल्प देविदास चौधरी याची वयाच्या 23 व्या वर्षी भारतीय सैन्य दलात नियुक्ती झाल्याने त्याचा ताप्ती पब्लिक स्कूलच्या प्रिन्सिपल नीना कटलर यांनी पूजन करीत सन्मान ेला.

विद्यार्थ्यांनी केले स्वागत
संकल्प चौधरी याने ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. त्यानंतरचे शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथील डिफेन्स अकॅडमीत पूर्ण केले. पुणे खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीमध्ये तीन वर्ष व नंतर देहरादून येथे एक वर्ष प्रशिक्षण घेतल्यावर 14 जूनपासून त्याची काश्मीर रायफल दलात लेफ्टनंटपदी जालंदर येथे नियुक्ती झाली.ताप्ती पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतलेला संकल्प चौधरीचे स्वागत शाळेतील शिक्षक वर्ग व विद्यार्थ्यांनी केले. यावेळी त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !