भुसावळातील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे गुणवंतांचा सत्कार

Shukla Yajurveda Brahmin Mandal in Bhusawal felicitates meritorious people भुसावळ (2 जुलै 2025) : शहरातील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळातर्फे नुकताच सप्तशृंगी मंदिर देवस्थान, तापी नगरात ब्राम्हण समाजातील यशवंत गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्रक व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष गजानन जोशी, कार्यक्रमाचे अध्यक्ष सुरेशराव कुलकर्णी, प्रमुख अतिथी के.नारखेडे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक व्यासपीठावर उपस्थित होते.
सत्काराने गुणवंत भारावले
याप्रसंगी ब्राम्हण समाजातील इयत्ता दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर या विभिन्न परीक्षांमध्ये देदीप्यमान व उल्लेखनीय यश प्राप्त केलेल्या गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचे पालक सुद्धा उपस्थित होते. कार्यक्रमास मंडळातील सर्वश्री रामचंद्र गचके, अनिल हिंगवे, अॅड.सुनील घोलप, चित्रा आचार्य, अविनाश पाठक, विलास जोशी, मंजुषा कुलकर्णी, किरण जोशी उपस्थित होते. एलआयसी ऑफिसर महेश कुलकर्णी यांनी याप्रसंगी मंडळास रोख स्वरूपात भरीव देणगी दिली.

ध्येय निश्चित करून यश प्रप्त
के.नारखेडे विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक म्हणाले की, विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून त्यानुषंगाने अभ्यासाचे नियोजन करावे व यश प्राप्त करावे. नेत्रदीपक यश प्राप्त करण्यासाठी विविध यशस्वी व्यक्तींची उदाहरणे देऊन समाजाची सेवा करण्याचा सल्लाही पाठक यांनी यावेळी दिला. सुरेशराव कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना जीवनात ज्ञानाचे महत्त्व सांगितले. रघुनाथराव गचके यांनी याप्रसंगी त्यांच्या सुमधुर आवाजात श्री गुरुदत्ताचे भजन गायिले आणि उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. सरस्वती विद्यामंदिर यावल येथे मुख्याध्यापकपदी नियुक्त झालेल्या श्रीकांत जोशी यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन संस्थेचे सचिव भूषण वैद्य यांनी करीत आभारही मानले.