नरडाणा येथे पतीने केली पत्नीची हत्या : शवविच्छेनाअंती गुन्हा उघड


Husband kills wife in Nardana : Crime revealed after autopsy धुळे (3 जुलै 2025) : धुळे तालुक्यातील नरडाणा येथे महिलेचा मृत्यू झाला होता. सुरूवातीला पतीने पत्नी छतावरून कोसळल्याचा बनाव केला मात्र तपासात आरोपी पतीनेच पत्नीचा खून केल्याचे स्पष्ट झाले. उदय भील (49) असे अटकेतील पतीचे नाव असून सुनीता भील (33) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.

काय घडले नरडाण्यात
उदय आणि सुनीता यांच्यात नेहमीच वाद होत असत. बहिणीला 12 हजार रुपये देण्याच्या कारणावरून त्यांच्यातील वाद विकोपाला गेला होता. याच वादातून 25 जून रोजी उदयने लाकडी दांडक्याने सुनीताच्या डोक्यात प्रहार केला, ज्यामुळे ती गंभीर जखमी झाली होती. घटनेनंतर उदयने सुनीताला तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र, त्याने डॉक्टरांना आणि पोलिसांना ती छतावरून कोसळल्याने जखमी झाल्याचे खोटे सांगितले. त्यानुसार, नरडाणा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.









शवविच्छेदन अहवालात बाब उघड
शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला आणि त्यातील माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास केला असता हा अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. नरडाणा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नीलेश मोरे यांनी वाढीव कलमानुसार गुन्हा दाखल करीत उदय भिल याला अटक केली. या कारवाईत नरडाणा पोलिस ठाण्याचे प्रभारी नीलेश मोरे यांच्यासह उपनिरीक्षक महाले, सहायक उपनिरीक्षक हेमंत पाटील, अर्पण मोरे, सुरज साळवे, राकेश शिरसाठ, सचिन बागुल यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !