धुळे गुन्हे शाखेची मोठी कारवाई : गावठी कट्टा व जिवंत काडतूसासह संशयीत जाळ्यात

Major action by Dhule Crime Branch : Suspect caught with village axe and live cartridge धुळे (3 जुलै 2025) : गावठी कट्टा बाळगून दशहत निर्माण करणार्या संशयीताला धुळे गुन्हे शाखेला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून गावठी कट्टा व जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. ही कारवाई मोहाडी हद्दीतील तिखी-रानमळा रस्त्यावर करण्यात आली. समीर हरुण खाटीक (21, रानमळा, ता.धुळे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना रानमळा रस्त्यावर संशयीत गावठी कट्टा बाळगून दशहत निर्माण करीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर बुधवार, 2 रोजी आरोपी समीर हरुण खाटीक (21, रानमळा, ता.धुळे) यास अटक करण्यात आली. आरोपीच्या ताब्यातून 41 हजार रुपये किंमतीचा देशी गावठी कट्टा व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. कॉन्स्टेबल जगदीश सूर्यवंशी यांच्या फिर्यादीवरुन मोहाडी नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, चेतन मुंढे, हवालदार प्रशांत चौधरी, आशिषकुमार वानखेडे, राहुल गिरी, कमलेश सूर्यवंशी, जगदीश सूर्यवंशी, हर्षल चौधरी, चालक हवालदार संजय सुरसे आदींच्या पथकाने केली.