भुसावळातील वर्ल्ड स्कूलमध्ये पूर्व पदवी प्रदान समारंभ उत्साहात


Pre-graduation ceremony at World School in Bhusawal is abuzz with excitement भुसावळ (3 जुलै 2025) : शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित द वर्ल्ड स्कूलमध्ये गुरुवार, 3 जुलै रोजी येथे पूर्व पदवी प्रदान समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला. प्रसंगी प्रमुख अतिथी डॉ.रेखा पाटील होत्या .शाळेच्या मुख्याध्यपिका पेट्रिश्या ह्यॅसेट यांनी प्रमुख अतिथी व शाळेचे अध्यक्ष निशिकांत कोलते, राजश्री कोलते, रामेश्वर अग्रवाल, डायरेक्टर व सी.ए. रोहित कोलते, या सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

विद्यार्थ्यांनी नृत्य करीत वेधले लक्ष
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच माता सरस्वतीच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. शाळेतील पूर्व प्राथमिक (प्रि.प्रायमरीच्या) विद्यार्थ्यांनी सुंदर नृत्य सादर केले. तसेच इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी सुध्दा नृत्य करून आपली कला सादर केली. त्यानंतर सिनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांना पूर्व पदवी प्रदान प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते बहाल करण्यात आले. या विद्यार्थ्यांचे सुंदर नृत्य पाहून आलेल्या मान्यवरांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी भरभरून कौतूक केले. शाळेतील पूर्व प्राथमिक (प्रि.प्रायमरीच्या) शिक्षिका, पर्यवेक्षिका आणि शाळेतील शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.














मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !