शिक्षणाबरोबर संस्काराचे बिजारोपण होणे काळाची गरज : शास्त्री धर्म स्वरूपदासजी महाराज

क्रिष्णा किड्स अकॅडेमीचे पारंपरीक पद्धतीने उद्घाटन


The need of the hour is to sow the seeds of culture along with education: Shastri Dharma Swaroopdasji Maharaj भुसावळ (3 जुलै 2025) : आधुनिक युगात उत्तम दर्जाचे शिक्षण मिळणे अत्यंत आवश्यक आहे परंतु शिक्षणाबरोबरच आपल्या प्राचीन सनातन संस्कृतीचे संस्कार विद्यार्थ्यांना मिळणे ही काळाची गरज आहे. माती ओली असताना जसा तिला हवा तसा आकार दिला जातो तसेच मुला-मुलींना बालवयातच संस्कार दिले जाऊ शकतात आणि हे कार्य 90 वर्षाची उज्वल शैक्षणिक परंपरा असलेली संस्था श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ अतिशय उत्कृष्ट रित्या करू शकते असा मला विश्वास वाटतो, असे प्रतिपादन स्वामीनारायण मंदिराचे प्रमुख शास्त्री धर्मस्वरूपदासजी महाराज यांनी केले. निमित्त होते श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ संचलित क्रिष्णा किड्स अकॅडमीच्या उद्घाटन सोहळ्याचे.

यांची होती उपस्थिती
शिक्षण क्षेत्रात मागील नऊ दशकापासून अग्रेसर असलेल्या संस्थेने बालकांना इंग्रजी शिक्षणा बरोबरच संस्कार देण्याच्या हेतूने तुकाराम नगर येथील स्वामीनारायण मंदिराजवळ ही अकॅडमी सुरू केली आहे. या शाळेचा उद्घाटन समारंभ मंगळवारी शाळेच्या परिसरात झाला. यावेळी व्यासपीठावर उद्घाटक शास्त्री धर्मस्वरूप दासजी महाराज, प्रमुख अतिथी व प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, संघाचे जिल्हा संघचालक डॉ.विजयजी सोनी, स्वामी मुक्तस्वरूप दास, स्वामी माधव स्वरूपदास, संस्था कार्यकारणी सदस्य श्रीधर खनके, श्भागवत वानखेडे आदी मान्यवर उपस्थित होते.



संस्कारक्षम शिक्षण मिळणार
रजनी सावकारे म्हणाल्या की, संस्थेच्या इतर शाळांप्रमाणे या शाळेत सुद्धा संस्कारक्षम असे उत्तम शिक्षण दिले जाईल याबाबत शंका नाही.

प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष सोनू मांडे यांनी तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक नारायण घोडके यांनी दिला. सूत्रसंचालन सोनाली वासकर तर आभार पर्यवेक्षक संजीव पाटील यांनी मानले. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी सहकार्य केले.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !