पक्ष संघटनेचे काम एक दिलाने करून भुसावळ तालुका भगवामय करा : रावेर लोकसभा संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ

सन्मान ज्येष्ठांचा सन्मान निष्ठावंतांचा अभियानाची सुरुवात


भुसावळ (3 जुलै 2025) : भुसावळ तालुक्यातील कुर्‍हा गावात पूर्वी संपूर्ण ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात होती. या परिसरात पक्ष संघटना मजबूत होती. एक कार्यकर्ता सक्रिय असला तर तो संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्त्यांना पक्ष संघटनेशी जोडून गाव भगवामय करतो. भविष्यात कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण करून आपसातील बाजूला मतभेद बाजूला सारून पक्ष संघटनेचे काम एक दिलाने करा. तालुक्याला भगवामय करून पुन्हा गत वैभवप्राप्त करून द्या, असे प्रतिपादन उपनेते रावेर लोकसभा संपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कुर्‍हा येथील शिवसेना शाखा उद्घाटनप्रसंगी केले.

यांची होती उपस्थिती
याप्रसंगी जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत, जिल्हा सह समन्वयक प्रा.उत्तम सुरवाडे, तालुकाप्रमुख निलेश महाजन, माजी उपजिल्हाप्रमुख अ‍ॅड.शाम श्रीगोंदेकर, विधानसभा क्षेत्र संघटक राजू इंगळे, तालुका समन्वयक हेमंत खंबायत, उपजिल्हा प्रसिद्धी प्रमुख, दिलीप सुरवाडे, व तालुकाप्रमुख रहीम गवळी, मग मकबूल मेंबर मेहमूद भाई, जग्गू खराडे, शरद जयस्वाल, योगेश बागुल, शरद जोहरे, आदी मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती होती.








शिवसैनिक विकला न गेल्याचा आनंद
गुलाबराव वाघ यांनी बोलताना, जुन्या आठवणींना उजाळा देत सांगितले की, ग्रामपंचायत शिवसेनेच्या ताब्यात असताना माझा सत्कार या ठिकाणी झाला होता . माझ्या उपनेते पदाच्या कारकिर्दीमधील पहिली शाखा आहे. हे कायम माझ्या कायम स्मरणात राहील. घटनेच्या कठीण काळातही आपण शिवसैनिक म्हणून झुकला नाहीत, वाकला नाहीत आणि विकलाही गेला नाही, याचा मनस्वी आनंद आहे.

प्रा.उत्तम सुरवाडे यांच्या संकल्पनेतून सुरू केलेला, सन्मान ज्येष्ठांचा सन्मान निष्ठावंतांचा, या अभियानाची सुरुवात गुलाबराव वाघ यांच्या हस्ते ज्येष्ठ शिवसैनिक, विठ्ठल कोळी, वसंता पारधी यांचा सत्कार करून सुरुवात करण्यात आली.

जिल्हाप्रमुख दीपकसिंग राजपूत यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. गुलाबराव वाघ यांची उपनेतेपदी झालेली नियुक्ती त्यामुळे पक्ष संघटनेत एक नवीन उत्साह संचारला असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्या नव्या शिवसैनिकांना निश्चित न्याय मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्यांचा संघटनात्मक कामाचा पाठपुरावा जबरदस्त आहे.

प्रास्ताविक जिल्हासह समन्वयक प्रा.उत्तम सुरवाडे यांनी केले. उपनेते गुलाबराव जी वाघ हे मातीशी आणि संघटनेशी इमान राखणारे आणि तळागाळातील शिवसैनिकापासून ते उपनेता पर्यंत पोहोचलेले व्यक्तिमत्व असून सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती, संघटनेची आणि तळागाळातील कार्यकर्त्यांशी नाड जोडलेली असल्यामुळे , तसेच सर्वांना न्याय देण्याची दृष्टी असलेले नेते आहे. त्यांच्या कार्यपद्धतीमुळे शिवसेनेच्या संघटनात्मक कामाला गती येईल, असा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी मान्यवरांचा सत्कार तालुकाप्रमुख निलेश महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. सूत्रसंचालन दिलीप सुरवाडे यांनी केले. या कार्यक्रमाला कुर्‍हा आणि भुसावळ परिसरातील जुनी जाणते शिवसैनिक, जितू नागपुरे, शाखा प्रमुख बाविस्कर, शाखेतील पदाधिकारी, ग्रामस्थ शिवसैनिक उपस्थित होते.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !