धुळे गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई : दुचाकी चोरणारी धुळे-नंदुरबारातील टोळी गजाआड
धुळे वैद्यकीय महाविद्यालयातून लांबवलेल्या 13 दुचाकी जप्त : आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

Dhule Crime Branch takes drastic action: Gang of bike thieves from Dhule-Nandurbar busted धुळे (4 जुलै 2025) : धुळे गुन्हे शाखेने मोठी कारवाई करीत नंदुरबार-धुळ्यातील दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींच्या ताब्यातून धुळ्यातील वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातूून लांबवण्यात आलेल्या तब्बल 13 दुचाकी जप्त करण्यात आल्या तर आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
धुळे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातून गेल्या काही दिवसांपासून दुचाकी चोरीच्या घटना वाढल्यानंतर धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिस निरीक्षकांना सूचना केल्या होत्या. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना दुचाकी चोरट्यांबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर तीन आरोपींना अटक करण्यात आली. धुळे शहरातील वडजाई रोडवरील लॉन्स जवळून सलमान सागीर सैय्यद (26, शंभर फुटी रोड, जामचा मळा, धुळे), अकीब उर्फ बाबा शेख जैनोद्दीन (36, चिराग गल्ली, नंदुरबार) व वसीम कलीम शेख (30, काली मशीदजवळ, नंदुरबार) यांना अटक करण्यात आली. आरोपींनी चौकशीत 13 दुचाकी काढून दिल्या व त्यातील नऊ दुचाकी शहर हद्दीतून चोरी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.