प्रांताधिकार्‍यांचे आदेश : अमळनेरातील गुन्हेगार जळगाव जिल्ह्यातून हद्दपार


अमळनेर (5 जुलै 2025) : शहरातील शिरुडनाका परिसरातील शिवाजीनगर भागातील रहिवासी कात्या उर्फ प्रमोद गौरव महाले याला अमळनेर प्रांताधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी सहा महिन्यांकरिता जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केल्याने गुन्हेगारी वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
कात्या उर्फ प्रमोद याच्यावर चोरी, दरोडा, जीवे मारण्याची धमकी देऊन लूटमार, जबरी लूट यासारखे सहा गुन्हे दाखल असून ते न्यायप्रविष्ट आहेत. कात्याची शहरात दहशत असून तो एका खटल्यात न्यायालयात हजर देखील न झाल्याने जामीनाच्या अटी शर्तींचा भंग झाला आहे.









अमळनेर पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी डीवायएसपी विनायक कोते यांच्याकडे हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला. डीवायएसपींनी तो प्रस्ताव चौकशी करून उपविभागीय अधिकार्‍यांकडे पाठवला. यावर सुनावणी होऊन दोन्ही बाजू ऐकून उपविभागीय अधिकारी नितीनकुमार मुंडावरे यांनी कात्या उर्फ प्रमोद महाले याला जळगाव जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी हद्दपार केले.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !