भुसावळ शहरातील ताप्ती स्कूलमध्ये स्वामी विवेकानंदाना आदरांजली

भुसावळ (5 जुलै 2025) : शहरातील ताप्ती पब्लिक सीबीएसई इंग्लिश मिडीयम स्कुलमध्ये स्वामी विवेकानंद यांना त्यांच्या स्मृती (पुण्यतिथी) दिनानिमित्त आदरांजली वाहण्यात आली. शाळेच्या प्रिंसीपल निना कटलर यांनी स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले.
स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन
प्राचार्य निना कटलर म्हणाल्या की, स्वामी विवेकानंद हे एक भारतीय तत्त्वज्ञ, समाजसुधारक आणि वेदांत व योग यांचे प्रणेते होते. त्यांचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे मूळ नाव नरेंद्रनाथ दत्त होते. रामकृष्ण परमहंस यांचे ते शिष्य होते. त्यांनी भारतीय संस्कृती आणि तत्त्वज्ञानाचा प्रसार पाश्चात्य देशांमध्ये केला. त्यांनी ‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना केली, ज्याद्वारे सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले जाते, असेही त्या म्हणाल्या. यावेळी शाळेतील विद्यार्थी व शिक्षक वर्ग उपस्थित होते.