भुसावळातील ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

भुसावळ (5 जुलै 2025) : शहरातील कोलते फाऊंडेशन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन संचलित ‘द वर्ल्ड स्कूल’ मध्ये शनिवार, 5 जुलै 2025 रोजी ‘अनुलोम’ संस्थेचे जनसेवक प्रदीप दामोदर दांडगे यांनी अनुगामी लोकराज्य महभियान (अनुलोम) अंतर्गत नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
आगामी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गुरुमंत्र मिळावा, जो त्यांच्या भावी काळात त्यांच्यासाठी मार्गदर्शक ठरेल या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यपिका पेट्रिश्या ह्यॅसेट यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमास शाळेतील शिक्षिका, पर्यवेक्षिका शिक्षकवृंद आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.