भुसावळातील तु.स.झोपे शाळेत पालक-शिक्षक सभा उत्साहात

Parent-teacher meeting in excitement at Tu.S. Zope School in Bhusawal भुसावळ (5 जुलै 2025) : शहरातील तु.स.झोपे शाळेत पालक-शिक्षक सभा शनिवार, 5 रोजी बहुसंख्य पालकांच्या उपस्थितीत उत्साहात झाली. अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थेचे सेक्रेटरी पी.व्ही.पाटील होते.
संस्थेचे पदाधिकारी प्रमोद नेमाडे, विकास पाचपांडे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती. पालक-शिक्षक संघांचे उपाध्यक्ष कुंदन पाटील उपस्थित होते. शाळेचे मुख्याध्यापक सुनील वानखेडे यांनी सभेचे प्रास्ताविक केले. विद्यार्थी व पालकांना स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन केले. पालक संघांतर्फे वर्गातून विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्याचा तसेच चौथी एम.टी.एस. परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस प्रदान करून गुणगौरव करण्यात आला.

सभेचे अध्यक्ष पी.व्ही.पाटील यांनी शिक्षक व पालकांना अनमोल मार्गदर्शन केले. मिलिंद पाटील यांनी उपस्थित सर्व मान्यवर व पालकांचे आभार मानले.