झोपडीत सुरू होता बनावट दारूचा कारखाना : शिरपूर तालुका पोलिसांच्या कारवाईत सव्वादोन लाखांचा मुद्देमाल जप्त


Fake liquor factory was operating in a hut : Shirpur taluka police seize goods worth Rs. 2.5 lakh in action धुळे (5 जुलै 2025) : शिरपूर तालुक्यातील न्यू बोराडीतील कुसट्या पाडा, जामणपाणी येथील एका झोपडीत बनावट दारू तयार केली जात असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. यावेळी पथकाने छापेमारी करीत अड्डा उद्ध्वस्त केला. कारवाईत दोन लाख 27 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपुर तालुका पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना गुप्त बातमीदारामार्फत कुसट्या पाडा, जामणपाणी येथे मच्छिंद्र ऊर्फ सेहवाग ताराचंद पावरा हा गावाजवळील एका झोपडीत लोकांच्या आरोग्यास अपाय होईल अशी बनावट दारु चोरटी विक्री करण्याच्या उद्देशाने तयार करीत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर छापेमारीत बनावट देशी दारु तयार करण्यासाठी लागणारे साहित्य आढळले.








या कारवाईत दोन लाख तीन हजार रुपये किंमतीचे बनावट दारूचे 58 बॉक्स , वीस हजार रुपये किमतीचे स्पिरिट व बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळून दोन लाख 27 हजार 640 रुपये किंमतीचे साहित्य जप्त करण्यात आले. या संदर्भात शिरपूर तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सुनील गोसावी, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिलिंद पवार, संतोष पाटील, स्वप्निल बांगर, योगेश मोरे, संजय भोई, विजय ढिवरे, दिनकर पवार, धनराज गोपाळ, सुनील पवार आदींच्या पथकाने केली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !