यावल तालुक्यात खाजगी ट्रॅव्हल्स नदीत कोसळली : एक जागीच ठार तर 25 प्रवासी जखमी

Private travel vehicle falls into river in Yaval taluka : One killed on the spot, 25 passengers injured यावल (6 जुलै 2025) : रिमझिम पाऊस सुरू असतानाच भरधाव ट्रॅव्हल्सवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने खाजगी बस आमोदा गावाजवळील मोर नदीत कोसळल्याची घटना रविवारी पहाटे सहा वाजता घडली. या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर 25 प्रवासी जखमी झाले. जखमींना नजीकच्या खाजगी तसेच ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.
कसा घडला अपघात !
इंदोरहून भुसावळकडे येणारी खाजगी ट्रॅव्हल्स (एम.पी.09-9009) ही बस आमोदा गावाजवळून वाहणार्या मोर नदीवरील पुलावरून जात असतांना चालकाचे नियंत्रण सुटताच थेट नदीपात्रात कोसळली. ही घटना रविवार, 6 जुलै रोजी पहाटे सहा वाजेच्या सुमारास घडली.
या अपघातात सुमारे 25 प्रवासी जखमी झाले असून एकाचा मृत्यू झाला. अपघातातील जखमींना खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील ग्रामस्थांनी दुर्घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. त्यांनी जखमींना रूग्णालयात पोहचवण्यासाठी मदत केली. या संदर्भात फैजपूर पोलिसात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. या अपघातामुळे आमोदा गावाजवळील मोर नदीवरील पुलाच्या भागातील अपघातांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
