भुसावळातील गोल्डन अवर हॉस्पिटलमध्ये डॉ.सना यांना निरोप

Farewell to Dr. Sana at Golden Hour Hospital in Bhusawal भुसावळ (5 जुलै 2025) : शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पिटलमध्ये कार्यरत डॉ.सना या उच्च शिक्षणासाठी मुंबई येथे जात असल्याने हॉस्पिटल प्रशासनातर्फे त्यांना नुकताच हॉस्पिटल तर्फे प्रेमपूर्वक निरोप देण्यात आला. यावेळी डॉ.सना यांच्या कार्यकाळातील आठवणींना उजाळा देत त्यांच्या सेवेचे उपस्थितांसह डॉ.सांतनू कुमार साहू यांनी कौतुक केले.
यांची होती उपस्थिती
रुग्णालयात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात रुग्णालयाचे प्रमुख डॉ.सांतनू कुमार साहू, व्यवस्थापकीय संचालक ईतिश्री साहू, डॉ.असरार अहमद, डॉ.आदिल शहा, डॉ.आदित्य पाटील, फार्मसी इन्चार्ज जितेश ढाके, एच.आर.प्रमुख गिरीश कोळी, मॅनेजर रियाज पटेल, रुचिता इंगळे, कांचन खुपसे, कृष्णा सोनवणे, हसन खान, चेतन जाधव, सीमा पाटील, जयश्री शर्मा, अपर्णा पचेरवाल, सपना रणदिवे, गुंजन कौशल, शिवाजी साळवे, खुशी कसडे, रेहान शेख आदींची उपस्थिती होती.
हॉस्पिटल रुग्णांसाठी आशेचा किरण : डॉ.साहू
भुसावळ शहरात 24 तास सेवेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले गोल्डन अवर हॉस्पिटल हे रुग्णांसाठी आशेचा किरण ठरल्याचे यावेळी डॉ.साहू म्हणाले. रुग्णालयाच्या प्रगतीत कर्मचार्यांचाही यशाचा वाटा असून प्रत्येकाने अधिक मेहनत व जोमाने कार्य करावे, असे डॉक्टरांनी सांगत डॉ.सना यांच्या कार्याचा गौरव केला. हॉस्पिटलतर्फे डॉ.सना यांचा भेटवस्तू देवून प्रसंगी सन्मान करण्यात आला.
