अहमदाबाद रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासामुळे गाड्यांच्या मार्गात तात्पुरते बदल

5 जुलैपासून असार्वासह साबरमती जंक्शनवर बदलांचा प्रभाव ; प्रवाशांनी घ्यावी नोंद


भुसावळ (6 जुलै 2025) : अहमदाबाद-रेल्वे जमीन विकास प्राधिकरणमार्फत अहमदाबाद रेल्वे स्थानकाचे जागतिक दर्जाच्या सुविधांमध्ये रूपांतर करण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प सध्या वेगाने सुरू आहे. या प्रकल्पाअंतर्गत प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वर नवीन ओव्हर ब्रिज व कंकर्स बांधणीचे काम करण्यात येणार असून, पायाभरणी व अन्य बांधकामासाठी 5 जुलै ते 12 सप्टेंबर 2025 या कालावधीत काम हाती घेण्यात आले आहे. या कालावधीत रेल्वे स्थानकावरील गाड्यांच्या मार्गात आणि थांब्यांमध्ये काही तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. प्रवाशांनी यांची नेाद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

असे झाले बदल
अहमदाबादऐवजी असार्वा स्थानकावर रेल्वे गाड्या येणार व तेथूनच सुटणार आहे. गाडी 12655 अहमदाबाद-चेन्नई सेंट्रल एक्सप्रेस ही 5 जुलैपासून अहमदाबादऐवजी असार्वा येथून रात्री 9.05 वाजता सुटेल. गाडी 12656 चेन्नई सेंट्रल-अहमदाबाद एक्सप्रेस ही 4 जुलैपासून अहमदाबादऐवजी असार्वा येथे सायंकाळी 6.20 वाजता पोहोचेल.
तसेच अहमदाबाद ऐवजी साबरमती जंक्शनवर सुध्दा रेल्वे गाड्यांना थांबा दिला आहे, यात गाडी 22738 हिसार-सिकंदराबाद एक्सप्रेसचे आगमन 7.10 वाजता होईल व सुटेल 7.20 वाजता दि. 6 जुलैपासून सुटेल, गाडी 22664 जोधपूर-चेन्नई एग्मोर एक्सप्रेस ही गाडी सकाळी 7.10 वाजता येईल व 7.20 वाजता दि. 8 जुलैपासून सुटेल, गाडी 22724 श्री गंगानगर-हजूर साहिब नांदेड एक्सप्रेस गाडीचे आगमन 7.10 तर सुटेल 7.20 दि. 5 जुलैपासून सुटेल,

रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणार्‍या गैरसोयीबद्दल दिलगीरी व्यक्त केली असून, ही कामे भविष्यातील सोयीसाठी आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. प्रवाशांनी सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वेने केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !