धुळ्यात चाकूच्या धाकावर दिड कोटी लुटले

Rs 1.5 crore robbed at knifepoint in Dhule धुळे (7 जुलै 2025) : धुळ्यानजीक कारमधून जाणार्या दोघांना पिस्टलाचा धाक दाखवत आठ दरोडेखोरांनी दिड कोटींची रक्कम लुटल्याचा प्रकार नुकताच घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. धुळे तालुका पोलिसात आठ दरोडेखोरांविरेधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सुरूवातीला तक्रारदारांनी लुटीची रक्कम चार कोटी असल्याचा दावा केला मात्र प्रत्यक्षात तक्रारीत ही रक्कम दिड कोटी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
पाळत ठेवून सशस्त्र दरोडा
सुरत येथील कल्पेश रमणभाई पटेल (46) व भरत जीवनभाई भालीया (42) हे स्कॉर्पिओ द्वारे दिड कोटींची रक्कम घेवून धुळेमार्गे नाशिककडे स्वीप्ट कार (एम.एच.04. डी. वाय. 2964) ने जात असताना पूरमेपाडा उड्डाणपुलाजवळ 5 रोजी पहाटे पाचच्या सुमारास एक कार आडवी आली व नंतर आणखी एक दुसरी कार आली. यावेळी दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून वाहनील रोकड लूटली. सुरूवातीला ही रक्कम चार कोटींची असल्याचा दावा संबंधितानी केला मात्र तक्रार देताना ही रक्कम दिड कोटी असल्याचे नमूद करण्यात आले.
रक्कम हवाल्याची असल्याचा संशय
लूटण्यात आलेली रक्कम नाशिक येथील एका कृषी क्षेत्राशी निगडित आहे. लखनऊ येथे व्यवहाराचे पैसे एकत्र करून ते नाशिकला नेले जात होते, असे कारण सांगण्यात आले आहे. मात्र ही रोकड हवालामधील असल्याचा संशय पोलिसांना आहे त्यावरून नाशिक व उत्तर प्रदेशात पथक चौकशीसाठी पाठवण्यात आले आहे.
