लक्झरी अपघातानंतर आमोद्याजवळ पुन्हा दुचाकींचा भीषण अपघात : गंभीर जखमीवर भुसावळात उपचार

After luxury accident, another horrific two-wheeler accident near Amoda : Seriously injured person treated in Bhusawal यावल (7 जुलै 2025) : आमोदा गावाजवळ रविवार, 6 जुलै रोजी सकाळी प्रवाशांनी भरलेली खाजगी बस पुलाचा कठडा तोडून नदी पात्रात कोसळून एकाचा मृत्यू तर 27 प्रवासी जखमी झाले होते. या अपघाताला काही तास उलटत नाही तोच रात्री साडे नऊ वाजता आमोदा गावाजवळ दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक झाली. या अपघात दोघे जखमी झाल्यानंतर एका गंभीर दुचाकीस्वाराला भुसावळातील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये उपचारार्थ हलवल्यानंतर डॉ.सांतनू कुमार साहू यांनी रुग्णावर शर्थीचे उपचार सुरू केले आहेत.
काय घडले आमोद्यात
आमोदा येथे रविवारी रात्री 9.15 वाजेच्या सुमारास भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात फैजपूर येथील एक तरुण बामणोद येथील एक असे दोघे जखमी झाले. या अपघातातील एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी भुसावळातील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये हलवण्यात आल्यानंतर डॉ.सांतनू कुमार साहू यांनी तातडीने रुग्णावर उपचार सुरू केले.
दुसर्या जखमीवर फैजपूरात उपचार
दुसर्या जखमीला फैजपूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आमोदाजवळ दुचाकी (एम.एच.19- 5697) भुसावळकडून येत असताना दुसरी दुचाकी (एम.एच.19 डी.जे. 4425) ही गाडी फैजपुरकडून बामणोदकडे जात असताना त्यांची समोरासमोर धडक होऊन जलील खलील तडवी (26, रा.फैजपूर) हा गंभीर जखमी झाला. त्यास भुसावळच्या आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. दुसरा जखमी बामणोद येथील कल्पेश महाजन असून त्याच्यावर फैजपूरात उपचार सुरू आहेत.
