इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचे पदग्रहण
नूतन अध्यक्षा सीमा सोनार यांनी सूत्रे स्वीकारली

Inauguration of Innerwheel Club of Bhusawal Railcity भुसावळ (7 जुलै 2025) : इनरव्हील क्लब ऑफ भुसावळ रेलसिटीचा पदग्रहण सोहळा नुकताच झाला. यावेळी नूतन अध्यक्षा सीमा मनोज सोनार यांनी मीनाक्षी धांडे यांच्याकडून तर योगीता वायकुळे यांनी किरण जावळे यांच्याकडून सचिवपदाची सूत्रे स्वीकारली.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ.रश्मी शर्मा उपस्थित होत्या. अध्यक्षपद स्वीकारताना सोनार यांनी समाजोपयोगी विविध उपक्रमांची घोषणा केली. क्लबच्या नववर्षाच्या पहिल्याच दिवशी डॉक्टर डे सेलिब्रेशन, वृक्षारोपण व झाडांचा वाढदिवस आणि सदस्यांच्या स्वखर्चातून प्रायोजित केलेला ऑर्थोबँक प्रकल्प-ज्यामध्ये गरजूंसाठी 40 उपयुक्त वस्तूंचा समावेश आहे – हे तीन महत्त्वाचे प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आले तसेच याच दिवशी इनरव्हीलच्या जनजागृतीसाठी स्टिकर्सचे वितरण करून क्लबची सामाजिक उपस्थिती वाढवण्याचा उपक्रमही पूर्णत्वास नेण्यात आला.
क्लब विविध उपक्रम राबवणार
यावर्षी क्लबतर्फे युवा विकासासाठी टॅली आणि जीएसटी प्रशिक्षण, पर्यावरणासाठी वृक्षारोपणाचा पुढील टप्पा व कापडी पिशव्यांचे वाटप, बालहक्कांसाठी दत्तक शाळांना मदत, महिलांसाठी कौशल्यविकास उपक्रम व शिवणयंत्र वाटप, आरोग्यासाठी रक्तदान शिबीर व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, सैनिकांचा सन्मान (ऑपरेशन सिंदूर), राखी उपक्रम व प्रेरणादायक प्रकल्प यांसारख्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. यासोबतच ई-स्कूल प्रकल्पाअंतर्गत दोन शाळांमध्ये 42 इंचांचे स्मार्ट टीव्ही आणि शैक्षणिक सॉफ्टवेअर बसवून तंत्रज्ञानाचा वापर करून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणपद्धतीचा लाभ मिळवून देण्यात येणार आहे, अशी माहिती अध्यक्षा सोनार यांनी यावेळी दिली.
