आषाढी वारीत अल्पवयीनावर अत्याचार : नराधमांना अटक

Minor raped during Ashadhi Wari : Man arrested दौंड (7 जुलै 2025) : पंढरपूर वारीसाठी निघालेल्या भजनी मंडळातील अल्पवयीन तरुणीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना समोर स्वामी चिंचोली (ता.दौंड) येथे 30 जून रोजी घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. अमीर सलीम पठाण (28, रा.अकलूज, ता. माळशिरस, जि.सोलापूर) व विकास नामदेव सातपुते (26, रा.भिगवण, ता.इंदापूर) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.
पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या तपास पथकांनी संशयित आरोपी अमिर पठाण याला रांजणगाव (ता.शिरूर) येथून तर विकास सातपुते याला भिगवण येथून अटक केली.
काय घडले वारीत
आषाढी वारीसाठी निघालेल्या या कुटुंबातील तीन महिलांना पुणे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली येथे दुचाकीवर आलेल्या दोन तरूणांनी शस्त्राचा धाक दाखवून त्यांच्या अंगावरील दीड लाख रूपये मूल्य असलेले दागिने काढून घेतले तर एका अल्पवयीन मुलीवर शस्त्राचा धाक दाखवून अत्याचार केला. पुणे ग्रामीण पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर सहा दिवसांनी संशयितांना अटक केली.
आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी
दरम्यान, 6 जून रोजी अत्याचार प्रकरणातील दोन संशयितांना बारामती येथील न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. संशयीत अमीर सलीम पठाण याच्यावर यापूर्वी पुणे शहर व ठाणे येथे चोरी, घरफोडी व अन्य गुन्हे, असे एकूण 17 गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती गोपाळ पवार यांनी दिली. अमीर पठाण याची बहिण ही विकास सातपुते याची पत्नी आहे. दोघांचेही हे दुसरे लग्न असल्याची माहिती आहे.
