भुसावळातील पथविक्रेत्यांबद्दल अवमानकारक टीपणी : भाजपाचे माजी नगरसेवक निकी बतरांविरोधात गुन्हा

पथविक्रेत्यांबद्दल अवमानकारक शब्दप्रयोगाचा व्हिडीओ व्हायरल


Derogatory remarks about street vendors in Bhusawal : Case filed against former BJP corporator Niki Batra भुसावळ (8 जुलै 2025) : पथविक्रेत्यांबद्दल अपशब्द वापरुन भावना दुखावल्या प्रकरणी भुसावळातील भाजपचे माजी नगरसेवक प्रकाश उर्फ निक्की बतरा यांच्या विरोधात बाजारपेठ पोलिसांत पथविक्रेता समितीचे अध्यक्ष राजेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन भावना दुखावल्याप्रकरणी अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

असे आहे प्रकरण
नगरपालिकेने वाल्मिक चौक ते अप्सरा चौक दरम्यान रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्यात आले. या रस्त्यावर दुभाजक टाकण्यावरुन पथविक्रेत्यांनी विरोध दर्शवला होता. यानंतर वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आठवडे बाजारात पथविक्रेत्यांना जागा देण्याचे निश्चित झाले. यानंतरच्या काळात माजी नगरसेवक निक्की बतरा यांनी एक व्हिडीओ तयार करुन सोशल मिडीयात टाकला. या व्हिडीओत बतरा त्यांनी पथविक्रेत्यांबद्दल अवमानकारक शब्द वापरले.



भाजपाच्या माजी नगरसेवकाने उधळली विक्रेत्यांबद्दल मुक्ताफळे
बाजारातील पथविक्रेत्यांचे अतिक्रमण हे कॅन्सरच्या आजारासारखे होते. 50 वर्षांपासून असलेली ही कॅन्सरसारख्या आजाराची समस्या आपण संपल्याचे त्यांनी सिंधी भाषेतील या व्हिडीओत म्हटले आहे. त्यांच्या या विधानामुळे पथविक्रेत्यांच्या भावना दुखावला. याबाबत पथविक्रेता गोपाळ पुरोहित, साजीद बागवान,उज्जला राजपूत, सागर ठाकूर यांनी बाजारपेठ पोलिसांत बतरा यांच्यावर कायदेशीर कारवाईसाठी अर्ज दिला. या प्रकरणी पथविक्रेता समितीचे अध्यक्ष राजेंद्र सपकाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन बतरा यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !