रेल्वे प्रवांशाना मोठा दिलासा : भुसावळतून थेट तिरुपतीसाठी रेल्वे

काचेगुडा-हिसार एक्स्प्रेस भुसावळमार्गे जाणार


Big relief for railway passengers : Direct train from Bhusawal to Tirupati भुसावळ (9 जुलै 2025) :  भुसावळ जंक्शनवर आता भारतातील सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रांपैकी एक असलेल्या तिरुपती धामची थेट रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळाली आहे ज्यामुळे भाविकांचा प्रवास अधिक सुखकर होणार आहे. 07717 व 07718 काचेगुडा-हिसार विशेष गाडीची सेवा आता तिरुपतीपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही विस्तारित सेवा सप्टेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. यामुळे भुसावळ आणि आसपासच्या भागातील भाविकांना तिरुपतीच्या दर्शनासाठी थेट प्रवासाची सोय उपलब्ध झाली आहे.

प्रवाशांच्या मागणीला यश
प्रवाशांच्या वाढत्या मागणीला आणि अतिरिक्त गर्दी पहाता, भारतीय रेल्वेने तिरुपती – हिसार दरम्यान एक विशेष साप्ताहिक रेल्वे सेवा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन सेवेमुळे भुसावळ येथील प्रवाशांना थेट तिरुपतीला जाण्याची सोय उपलब्ध झाली आहे, ज्यामुळे दक्षिण भारतातील या प्रसिद्ध तीर्थक्षेत्राला भेट देणे अधिक सुलभ झाले आहे.



गाडी नंबर 07717-07718 तिरुपती-हिसार-तिरुपती (साप्ताहिक विशेष) या गाडीच्या 24 फेर्‍या होणार आहे. गाडी 07717 तिरुपती ते हिसार ही विशेष गाडी 9 जुलै पासून ते 24 सप्टेंबर 2025 पर्यंत दर बुधवारी तिरुपती येथून रात्री 11.45 वाजता सुटेल आणि शनिवारी दुपारी 2.5 वाजता हिसार येथे पोहोचेल. गाडी 07718 हिसार ते तिरुपती ही विशेष गाडी 13 जुलैपासून ते 28 सप्टेंबरपर्यंत दर रविवारी हिसार येथून रात्री 11.15 वाजता सुटेल आणि बुधवारी सकाळी 11.30 वाजता तिरुपती येथे पोहोचेल.

या स्थानकावर थांबा
या गाडीला रेनिगुंटा, रझमपेट, कड्डुपा, येर्रगुंटला, ताडीपत्री, गुत्ती, गुंटकळ, धोन, कुर्नूल सिटी, गदवाल, महबूबनगर, जडचर्ला, काचीगुडा, मलकाजगिरी, मेडचल, कमारेड्डी, निजामाबाद, बासर, धर्माबाद, मुदखेड, नांदेड, पूर्णा, बसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नंदुरबार, उधना, वडोदरा, रतलाम, मन्दसौर, नीमच, चित्तौडगड, भीलवाडा, बिजैनगर, नसीराबाद, अजमेर, किशनगढ, फुलेरा जंक्शन रिंगस जंक्शन,सीकर जंक्शन, नवालगढ, झुंझुनू, चिरावा, लोहारू आणि सादुलपूर या स्थानकांवर थांबा असेल.

या गाडीला 20 तृतीय श्रेणी वातानुकूलित डबे आणि 2 सामानवाहू व गार्ड ब्रेक व्हॅन्स असतील,अशी एकूण 22 डब्यांची रचना असेल. रेल्वे प्रशासनातर्फे या गाडीचा लाभ घेण्याच आवाहन केले आहे. या नवीन सेवेमुळे भुसावळ आणि आसपासच्या परिसरातील हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापूर्वी भुसावळ येथून भगत की कोठी कोईम्बतुर (06182) ही गाडी आहे, त्यापाठोपाठ आता तिरूपती – हिसार ही गाडी सुरू झाली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !