धुळे पोलिस अधीक्षकांचा खाकीतील कर्मचार्‍यांना दणका : आरोपीला सिगारेटची मुभा देणार्‍या तिघांचे निलंबन


Dhule Superintendent of Police slaps khaki employees: Three suspended for allowing accused to smoke cigarettes धुळे (9 जुलै 2025) : बेलवर आणलेल्या आरोपीला सिगारेट पिवू देण्याची मुभा देण्यात आल्याचा फोटो समोर आल्यानंतर धुळ्यातील पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पोलिस दलातील तीन कर्मचार्‍यांचे निलंबन केले आहे. या कारवाईने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

पोलिस शिपाई राहुल जगताप, पोलिस शिपाई वसीम शेख इक्बाल व हवालदार महेंद्र जाधव अशी निलंबित कर्मचार्‍यांचे नावे आहेत.




काय घडले धुळ्यात
सूत्रांच्या माहितीनुसार, चाळीसगाव रोड हद्दीतील गुन्हेगार अकबर जलेला उर्फ अकबर अली कैसर अली शाह हा एनपीपीएस प्रकरणात धुळे बेलवर न्यायालयात आणल्यानंतर बंदोबस्तावरील कर्मचार्‍यांनी आरोपीला सिगारेट पिवू दिल्याची मुभा दिली व त्याबाबतचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर पोलिसांच्या कृतीवर टीकेची झोड उठली.

जिल्हा पोलिस अधीक्षकांनी या गंभीर प्रकरणाची दखल घेत तत्काळ प्रभावाने आरोपीला आणणार्‍या तीन कर्मचार्‍यांना निलंबित केले असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे. निलंबित कर्मचार्‍यांची विभागीय चौकशी केली जात आहे.













मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !