भुसावळातील मेहता विद्यामंदिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
Health check-up of students at Mehta Vidyamandir in Bhusawal भुसावळ (9 जुलै 2025) : शहरातील श्री र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.सनी जैन, औषध निर्माण अधिकारी श्रीकांत भांडारकर, परिचारिका रोहिणी बोरसे, वैद्यकीय अधिकारी डॉ.वनश्री पालवे उपस्थित होत्या.
सर्वप्रथम डॉक्टरांनी विद्यार्थ्यांना आपल्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले तसेच आरोग्याच्या चांगल्या सवयी, आहाराविषयी डॉक्टरांनी अनमोल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना आरोग्याविषयी असलेल्या समस्या डॉक्टरांनी सोडवल्या तसेच ज्या विद्यार्थ्यांना उपचाराची गरज आहे त्या विद्यार्थ्यांना पुढील उपचारासाठी डॉक्टरांनी सल्ला दिला.

प्रत्येक विद्यार्थ्याची डॉक्टरांनी वैयक्तिक रित्या तपासणी केली व त्यांना आवश्यक सल्ला दिला. विद्यालयात विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने उपलब्ध करण्यात आलेल्या सोयी उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन डॉक्टर सनी जैन यांनी केले.
दीपक तेली यांनी सूत्रसंचालन तर आभार रवींद्र पाटील यांनी मानले. प्रधानाध्यापिका रिता शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्यांनी आरोग्य तपासणीसाठी योग्य नियोजन व आयोजन केले.






