गुरु तुजविण न मिळे ज्ञान, ज्ञानविण जगी न होई सन्मान


भुसावळ (10 जुलै 2025) : जळगाव पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या संकल्पनेतुन भुसावळ तालुका पोलिस ठाणे हद्दीतील विविध शाळा महाविद्यालयांमध्ये गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून गुरु जणांचा सत्कार करण्यात आला. भुसावळ तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक महेश गायकवाड यांनी सहकार्‍यांसह जात गुरूजणांचा सन्मान केला.

या शाळामध्ये उपक्रम
कुर्‍हा गावातील आदर्श आयटीआयचे प्राचार्य कुरेशी, कुर्‍हा येथील राजाराम धोंडू माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक चौधरी, वरडसीम येथील पंडीत नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक खेडकर, दादासाहेब दामू पाटील विद्यालय, सूनसगाव येथील सपकाळे आदींचा गुरूपौर्णिमा निमित्ताने जावून सन्मान करण्यात आला. यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !