जळगाव जिल्ह्यातील गंभीर रुग्णांसाठी देवदूत ठरताय डॉ.सांतनू कुमार साहू

जळगाव भुसावळातील गोल्डन अवर हॉस्पिटलची सर्वदूर ख्याती : रुग्णांसाठी हॉस्पिटल ठरतेय आशेचा किरणजिल्ह्यातील गंभीर रुग्णांसाठी देवदूत ठरताय डॉ.सांतनू कुमार साहू


Dr. Santanu Kumar Sahu is becoming an angel for serious patients in Jalgaon district भुसावळ (11 जुलै 2025) : ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ या भावनेतून डॉ.सांतनू कुमार साहू यांनी भुसावळ शहरात सुमारे दोन वर्षांपूर्वी ‘गोल्डन अवर हॉस्पिटल’ च्या माध्यमातून रुग्ण सेवा सुरू केली. घात-अपघातात जखमी झालेल्या गंभीर रुग्णांवर तातडीने सुरुवातीचे काही तासात वेळेवर उपचार मिळाल्याने त्यांना जीवनदान मिळाल्याने या रुग्णांसाठी डॉ.सांतनू कुमार साहू हे ‘देवदूत’ ठरले आहेत.

डॉ.सांतनूकुमार साहू रुग्णांसाठी ‘देवदूत’
भुसावळातील गोल्डन अवर हॉस्पीटलमध्ये केवळ भुसावळ शहरच नव्हे तर भुसावळ विभागातील यावल, रावेर, बोदवड, मुक्ताईनगर तालुक्यातील बहुतांशी गावांसह तसेच जळगाव जिल्ह्यातील अनेक भागांसह मध्यप्रदेश सीमेतील बर्‍हाणपूर भागातील सुमारे 15 हजारांवर रुग्णांवर शर्थीचे उपचार केल्यानंतर रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. शेकडो रुग्ण आजही अभिमानाने सांगतात की, डॉ.सांतनू कुमार साहू यांच्या प्रयत्नामुळेच आज आम्हाला घरी सुखरूप परत येणे शक्य झाले आहे. ‘सुरुवात छोटी विचार मोठा’ या उक्तीप्रमाणे कार्य करीत भुसावळच्या डॉ.सांतनू कुमार साहू यांनी सुरु केलेल्या रुग्णसेवेचा वेल अल्पावधीतच उंचावला आहे.




चार हजारांवर रुग्णांवर शस्त्रक्रिया
प्रत्येक आपत्कालीन स्थितीत भुसावळसह जिल्हाभरातील रुग्णांसाठी ‘गोल्डन अवर हॉस्पिटल’ हे खरोखरच गोल्डन अवर ठरत आहे. वैद्यकीय सेवेच्या 15 वर्षांच्या कार्यकाळात 15 हजाराहून अधिक रुग्णांची तपासणी व यशस्वी उपचारासह 15 हजारांवर क्रिटिकल स्थितीतील रुग्णांवर उपचार तर चाचर हजार रुग्णांवर विविध यशस्वी शस्त्रक्रिया करण्याची किमया डॉ.सांतनू कुमार साहू यांनी साधली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या हॉस्पिटलातील अत्याधुनिक सेवा सुविधा, विनम्रसेवा यासह विविध गंभीर आजारावर एकाच छताखाली यशस्वी उपचाराच्या सुविधा गोल्डन अवर हॉस्पिटल’ मध्ये उपलब्ध आहेत.

उच्च शिक्षित डॉक्टर
2008 मध्ये उडीसातील ब्रम्हपूर युनिव्हर्सिटीतून एमबीबीएसचे शिक्षण पूर्ण करीत तामिळनाडूतील तिरुचिरापल्ली कावेरी युनिव्हर्सिटीतून डॉ.साहू यांनी डीएनबीचे शिक्षण घेतले. यासह अहमदाबाद मधील अपोलो इंटरनॅशनल हॉस्पिटलात ‘एफएनबी’ चे कार्य पूर्ण केले. मधुमेहावर फेलोशिप ‘ट्रेनिंग इन एंडोक्राइनोलॉजिस्ट’ तर चेन्नईतील मोहन फाउंडेशनमध्ये सी.सी.ई.बी.डी.एम पूर्ण केले. या कार्याला अहमदाबादच्या इन इकोकार्डियोग्राफीची फेलोशिप तर चेन्नईच्या ‘इन मेमोरी मॅनेजमेंट अ‍ॅण्ड सायको न्यूरोबिक्स’ फेलोशिपची जोड मिळाली. या उच्चशिक्षणा बरोबरच न्यू दिल्लीतील मौलाना आझाद मेडिकल कॉलेजमधील रजिस्ट्रार तर माऊंट अबू येथील ग्लोबल हॉस्पीटल, राजस्थानातील उदयपूरमधील गीतांजली मेडिकल कॉलेज तसेच अपोलो हॉस्पिटल अहमदाबाद तसेच मध्यप्रदेशातील बर्‍हाणपूर येथील ‘ऑल इज वेल हॉस्पिटलच्या एक्स कन्सल्टंटच्या तीन वर्षाच्या अनुभवाने वैद्यकीय क्षेत्रातील दीर्घ ज्ञान मिळवून दिले.

भुसावळात क्रिटिकल केअरची सुसज्ज यंत्रणा
मृत्यूच्या दारात उभा असणार्‍या रुग्णांना वाचविण्यासाठी महत्त्वाची ठरणारी क्रिटिकल केअर यंत्रणा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे. अत्यावश्यक रुग्णांसाठी काम करणार्‍या डॉक्टर, नर्सेस, टेक्निशियन, न्यूट्रिशन यांना एकत्र करून गुंतागुंतीच्या प्रसंगी आधूनिक उपचार केले जातात. नवतंत्र आधुनिक उपचार पद्धती याबाबत विचार विनिमय होत असल्याने अतिदक्षता विभागातील रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी त्याचा फायदा होत आहे.

रुग्णालयात अशा आहेत सुविधा
परिपूर्ण सुविधांनी युक्त अतिदक्षता विभाग, अद्यावत सुसज्ज ऑपरेशन थिएटर, 10 आयसीयु बेडस्, चार एचडीयू डिपार्टमेटल युनिट, तीन डायलिसीस बेड, सहा खाजगी बेड, 19 सुटसुटीत जनरल बेड्स, कॅन्टीन, वेटिंग हॉलची सुविधा, तीन असिस्टन्स तज्ञ डॉक्टर्स, तीन आरएमओ, 11 नर्सिंगसह 26 कर्मचारी स्टॉप व 24 तास सात दिवस खुले एकमेव हॉस्पिटल तज्ज्ञ डॉक्टर्स, प्रशिक्षित स्टाफसह अद्यावत यंत्रणा, न्यूरो, पल्मोनरी, कार्डियाक गॅस्ट्रो, नेफ्रोसह ऑबस्टेस्ट्रिक्स क्रिटिकल केअर, सेप्सीस अ‍ॅण्ड मल्टी ऑर्गन फेल्युअर, किडनीचे विकार, हृदयरोग, फुप्फुसाचे विविध आजाराचे निदान व उपचार मधुमेहस थॉयरॉईड ग्रंथीचे आजार, रक्तविकार, पोटाचे विकार, संधिवात, सांधेदुखीवर उपचार विद्युत शॉक, विषबाधा, सर्पदंश उपचार, अ‍ॅक्सीडेंट अ‍ॅण्ड पॉलीट्रामा उपचार.

भुसावळातील हॉस्पीटलचा असा आहे पत्ता
ज्ञानरंजन टॉवर, सुराणा बिल्डींगजवळ, आनंद नगर, जामनेर रोड, भुसावळ, जि.जळगाव संपर्क- 7773944435

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !