भुसावळातील भोळे महाविद्यालयात कला मंडळाचे थाटात उद्घाटन
भुसावळ (11 जुलै 2025) : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात नुकतेच सुगंधी झाडाचे रोपण करून सांस्कृतिक आणि कला मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्राचार्य परिषदेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ.आर.पी.फालक होते.
गुरुचे स्थान परमेश्वराच्या समकक्ष
प्राचार्य डॉ.आर.पी.फालक म्हणाले की, आपली संस्कृती ही हजारो वर्षांपासून अत्यंत प्रगत संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये गुरूचे स्थान परेश्वराच्या स्थानाच्या समकक्ष आहे. या पार्श्वभीवर सांस्कृतिक आणि कला मंडळाचे उद्घाटन गुरुपौर्णिमेच्या दिवशी होणे ही आपल्या सांस्कृतिक परंपरेला धरून आहे. वातावरणाचा बिघडत चाललेला समतोल लक्षात घेता झाडांची आवश्यकता आहे. त्यातही सुगंधी झाडांमुळे केवळ पर्यावरण समतोल राखणे एवढेच कार्य होत नाही तर वातावरणात दरवळत असलेल्या सुगंधाने परिसर प्रफुल्लित ही होतो. म्हणून आजचा हा उद्घाटनाचा कार्यक्रम खरोखर आगळा वेगळा ठरणार आहे.



अनेक झाडांचे रोपण
कार्यक्रमानंतर महाविद्यालय परिसरात एका प्रातिनिधिक झाडाचे रोपण प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांच्याहस्ते करण्यात आल्यानंतर इतर अनेक अनेक सुगंधी फुल झाडांचे रोपण महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या हस्ते करण्यात आले. यात मोगरा, गुलबक्षी, गुलाब, रानजाई, चाफा अशा अनेक सुगंधी झाडाचे रोपण करण्यात आले.
यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रास्ताविक सांस्कृतिक समिती प्रमुख प्रा.श्रेया चौधरीतर आभार प्रा.डॉ.माधुरी पाटील यांनी मानले. प्रा.डॉ.जी.पी.वाघुळदे, प्रा.डॉ.जयश्री सरोदे, प्रा.डॉ.संजय चौधरी, प्रा.डॉ.आर.बी.ढाके, प्रा.डॉ.अंजली पाटील, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.निर्मला वानखेडे, प्रा.डॉ.दयाघन राणे, प्रा.एस.एस.पाटील, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संजय चौधरी आणि इतर शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.





