भुसावळातील के.नारखेडे विद्यालयात लोकसंख्या दिनानिमित्त पोस्टर्स स्पर्धा


भुसावळ (12 जुलै 2025) : लोकसंख्या दिनानिमित्त भुसावळ शहरातील के.नारखेडे विद्यालयात पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी संस्था सदस्य पी.व्ही.पाटील व भुसावळ शहरचे पोलिस उपनिरीक्षक राहुल भंडारे, शाळेचे मुख्याध्यापक वाय.एन.झोपे, पर्यवेक्षिका संगीता अडकमोल, एस.एल.राणे, ज्येष्ठ शिक्षक एस.पी.पाठक यांनी विद्यार्थ्यांनी बनवलेल्या पोस्टरचे कौतुक केले.

लोकसंख्येचा भस्मासूर वाढला : पोस्टर्स प्रदर्शनातून जनजागृती
जगभरात अनेक देशांसाठी वाढलेली लोकसंख्या हा मोठा मुद्दा आहे. लोकसंख्येवर सगळं अवलंबून असतं. देशाची प्रगती ते आर्थिक परिस्थिती ही सुद्धा लोकसंख्येवरच अवलंबून असते. जागतिक लोकसंख्या दिवस दरवर्षी 11 जुलै रोजी जगभरात साजरा केला जातो. जगभर अतिशय वेगाने वाढत असलेल्या लोकसंख्येचा भस्मासुर हा अनेक समस्या निर्माण करीत आहेत याची जाणीव समाजाला होणे खूपच आवश्यक आहे. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी लोकांना आरोग्य शिक्षण तसेच देशातील संपत्तीवर पडत असलेला ताण अशा अनेक समस्यांवर चित्रण करून जनजागृती घडवण्याचा प्रयत्न केला. भारतासारख्या लोकशाही देशाने लोकसंख्या व्यवस्थापन देखील नियोजित रीतीने करण्याची सुरुवात केली आहे




लोकसंख्या उपायांवर चर्चा
शाळेतील भूगोल शिक्षक एस.पी.महाजन, एस.एस.पाटील, एस.एस.कापसे यांनी लोकसंख्येच्या समस्यांवर उपाय आणि भविष्यात या समस्येला कसे सामोरे जावे याबद्दल विद्यार्थ्यांशी चर्चा केली. यशस्वीतेसाठी कलाशिक्षक एम.व्ही.गरुडे, एच.व्ही.पाटील यांनी विशेष प्रयत्न केले. यशस्वीतेसाठी एच.व्ही.पाटील, एस.एम.चिपळोणकर, एन.जे.पाटील, व्ही.टी.भंगाळे, एम.व्ही.कुलकर्णी, व्ही.जी.सोनवणे आदींचे सहकार्य लाभले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !