भुसावळातील श्री.र.न.मेहता हिंदी प्राथमिक विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा उत्साहात
Sri.R.N.Mehta Hindi Primary Vidyamandir भुसावळ (12 जुलै 2025) : ‘वृक्ष हेच खरे गुरु’ या संकल्पने अंतर्गत वृक्षांना वंदन करून गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली व वृक्षारोपण व संवर्धन करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी घेतला. विद्यार्थ्यांनी गुरूंबद्दल आपले मनोगत सादर केले तसेच गुरूंनी गुरु म्हणजे काय? आपल्या जीवनात गुरूंचे महत्त्व, जीवनाला योग्य दिशा देणारी व्यक्तिमत्व म्हणजेच गुरु याबद्दल शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
गुरुंकडून जीवनाला दिशा
वर्तमानपत्रातील गुरु बद्दल आलेली माहितीचे वाचन विद्यार्थ्यांनी केले. गुरूंची महती सांगणारी गीतांचे गायन विद्यार्थ्यांनी केले. गुरूंचे उपकार आयुष्यात फिटणार नाही तसा सार विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगत सादर केला. आपल्या जीवनात येणार्या गुरूंचा आदर सत्कार आपण केला पाहिजे तसेच त्यांचे महत्त्व जाणले पाहिजे, गुरुच आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात, असे प्रतिपादन रवींद्र पाटील यांनी केले. या कार्यक्रमासाठी प्रधानाध्यापिका रिता शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली.








