ऑनलाईन फसवणूक टाळण्यासाठी अनोळखी लिंकला क्लीक करणे टाळा : पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे

शहरातील प.क.कोटेचा महिला महाविद्यालयात सायबर क्राईम विषयावर व्याख्यान


Lecture on cybercrime at P.K. Kote’s Mahila College in the city भुसावळ (12 जुलै 2025) : सध्या ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण वाढले असून फसवणुकीच्या घटना टाळण्यासाठी नागरिकांनी अनोळखी लिंकला क्लीक करणे टाळावे, असे आवाहन भुसावळ शहरचे पोलिस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी केले. शहरातील
श्रीमती प . क. कोटेचा महिला महाविद्यालयात शुक्रवार, 11 जुलै 2025 रोजी कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे गुरुपौर्णिमेनिमित्त सायबर क्राईम या विषयावर ते बोलत होते.

सोशल मिडीया वापरताना सावधान !
पोलिस निरीक्षक उद्धव दमाळे यांनी सायबर क्राईम या विषयावर माहिती देताना बँकेपासून ते फेसबुक, इंस्टाग्रामपर्यंत होणार्‍या सर्व डिजिटल गुन्ह्यांची सविस्तर माहिती दिली.




फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅपवर आलेल्या कुठल्याही लिंकवर क्लिक न करणे, किंवा ऑनलाईन लिंक शेअर न करणे, कुठलाही क्यू आर कोड स्कॅन न करणे, इंस्टाग्राम, फेसबुकचे पासवर्ड कुणालाही शेअर न करणे, गुगलचा जपून वापर करने, ऑनलाईन कर्जाच्या मोहात न पडणे अश्या अनेक उदाहरणांसहित माहिती त्यांनी देत दररोज होणार्‍या फसवणुकीची घ्यावयाची काळजी यावर सुद्धा मार्गदर्शन केले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
अध्यक्षस्थानी कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक व्ही.एस.खरे होते. शहर ठाण्याचे संदेश निकम उपस्थित होते. सूत्रसंचालन कनिष्ठ महाविद्यालयाचे एनएसएस प्रमुख प्रा.आर.एच.पाटील यांनी तर आभार वरिष्ठ महाविद्यालयाचे एनएसएस प्रमुख डॉ. मीना चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक मंडळी तसेच विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !