शिवरायांच्या किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश : भुसावळात भाजपाने केला जल्लोष


Shivaji’s forts included in UNESCO’s World Heritage List: BJP celebrates in Bhusawal भुसावळ (12 जुलै 2025) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या 12 किल्ल्यांचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आल्यानतंर या निर्णयाचे स्वागत भुसावळातील भाजपेयींनी केले.

महाराष्ट्रातील 11 किल्ल्यांसह तामिळनाडूतील एका किल्ल्याचा युनोस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत सोशल मीडियावर पोस्ट करून माहिती दिली. या निर्णयानंतर भुसावळातील भारतीय जनता पार्टीतर्फे शिवभक्तांनी भुसावळ रेल्वे स्थानका बाहेरील छत्रपतींच्या अश्वारूढ पुतळ्यास प्रमोद सावकारे यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.




यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय.. जय भवानी जय शिवाजी च्या घोषणा दिल्या व फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

यांची होती उपस्थिती
यावेळी भारतीय जनता पार्टीचे राज्य परिषद सदस्य प्रमोद सावकारे, दक्षिण शहराध्यक्ष किरण कोलते, उत्तर शहराध्यक्ष संदीप सुरवाडे, व्यापारी आघाडी प्रदेश उपाध्यक्ष मनोज बियाणी, जिल्हा सरचिटणीस परीक्षीत बर्‍हाटे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश सपकाळे, पिंटू कोठारी, नीळकंठ भारंबे, प्रवीण इखणकर, ललित मराठे, पुरुषोत्तम नारखेडे, ड बोधराज चौधरी, राजेंद्र आवटे, अजय नागराणी, देवेंद्र वाणी, नितीन धांडे, अनिरुद्ध कुलकर्णी, सागर चौधरी, राहुल तायडे, चेतन बोरोले, शैलेंद्र ठाकरे, रवी ढगे, शंकर शेळके, राजू खरारे, प्रशांत पाटील,गौरव वाघ, चेतन जैन, प्रेमचंद तायडे, गोपी राजपूत, योगेंद्र हरणे, सचिन बर्‍हाटे, दिनेश राणे, पंकज कोलते, बॉबी डॅनियल, गोलू चौधरी, खिलेश महाजन यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शिवभक्तांची उपस्थिती होती.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !