श्री स्वामीनारायण गुरुकुलमध्ये युपीएससी उत्तीर्ण योगेश पाटील यांचा गौरव


Yogesh Patil, who passed UPSC in Shri Swaminarayan Gurukul, is honored. भुसावळ (13 जुलै 2025) : भुसावळ तालुक्यातील साकेगाव येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलमध्ये शनिवारी युपीएससी (सिव्हिल सेवा) परीक्षेत यश मिळवलेला माजी विद्यार्थी योगेश ललित पाटील यांचा सत्कार करण्यात आला.

प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे प्रशासनाधिकारी राजेंद्रकुमार फेगडे, संस्था सदस्य गणेश फेगडे, माजी मुख्याध्यापक जयंत नेवे होते. यूपीएससी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या या विद्यार्थ्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ व प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला.




योगेश पाटील यांनी आपल्या भाषणात यूपीएससी परीक्षेतील कठोर अभ्यास सातत्य आणि मानसिक तयारी, ध्यान साधना याची जोड असावी यावर भर देत विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. हे यश केवळ वैयक्तिक मेहनतीचे नसून पालक मार्गदर्शन आणि शिक्षकांचे योगदान असते, असे त्यांनी नम्रपणे नमूद केले. यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी योगदान दिले. सूत्रसंचालन उज्ज्वला धांडे यांनी तर आभार मनोज भोसले यांनी मानले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !