रावेरच्या शेतकर्‍यावर संकट : 3500 केळी खोडे कापून फेकली


Crisis for Raver farmers: 3500 banana trunks cut and thrown away रावेर (13 जुलै 2025) : शेतकर्‍यांच्या शेतातील केळी खोडे कापणीच्या प्रकारांना अलीकडे पायबंद लागल्यानंतर पुन्हा विकृताने शेतकर्‍याच्या शेतात नुकसान केल्याचा प्रकार समोर आला. रावेर तालुक्यातील चिनावल येथील कोचूर रोडला लागून जुन्या सावदा रस्त्यावरील खेमा कामा पाटील यांच्या शेतात नवीन लागवड केलेली केळीची तीन हजार 500 खोडे अज्ञात व्यक्तींनी एकाच रात्रीत कापून फेकली. गुरुवारी रात्री ही घटना घडली. यामुळे या शेतकर्‍याचे लाखोंचे नुकसान झाले.

नुकसानीने शेतकरी संतप्त
या प्रकाराची माहिती चिनावल व परिसरात समजताच शेतकर्‍यांमध्ये संताप पसरला आहे. खेमा कामा पाटील यांनी नुकतीच मे महिन्यात लाखो रुपये खर्च करून केळीचे बेणे, ठिबक सिंचन व आंतर मशागतीसाठी खर्च केले होते मात्र गुरुवारी रात्री अज्ञातांनी संपूर्ण तीन हजार 500 केळीची खोडे अक्षरशः कापून फेकून दिली. या प्रकाराबाबत शेतकर्‍याने सावदा पोलिस स्टेशनला फिर्याद नोंदवली आहे.




अधिकार्‍यांची धाव
घटनास्थळी सावदा सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल पाटील, पीएसआय सानप, हवालदार विनोद पाटील, मजहर तडवी व कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

चिनावल तलाठी मंडळाधिकारी अमोल चौधरी यांनी तहसीलदारांनाही माहिती देऊन या नुकसानीस कारणीभूत असलेल्या अज्ञात व्यक्तींना शोधून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

 








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !