धुळ्यात प्राणघातक हल्ला करणार्यांची पोलिसांनी काढली धिंड

Police nab those responsible for deadly attack in Dhule धुळे (13 जुलै 2025) : धुळ्यातील जुने धुळ्यात शुक्रवारी सायंकाळी दोन गटात वाद झाल्यानंतर तुंबळ हाणामारी झाली. या प्रकारानंतर परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या प्रकरणातील तिघांची शनिवारी पोलिसांनी धिंड काढली. पोलिस प्रशासन गुन्हेगारी प्रवृत्तींना कदापि खतपाणी घालणार नाही, असा इशारा यावेळी या कृतीतून देण्यात आला.
काय घडले धुळ्यात
सिद्धार्थ राजू देवरे (वय 32) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार ज्ञानसागर उर्फ नाना विठ्ठल साळवे, विजय श्रीराम अहिरे, सुमीत तुकाराम शिंदे, अमर धर्मा अहिरे, योगेश सूर्यवंशी, भय्या शेवतकर यांनी वाद घातला. तसेच ठार मारण्याच्या उद्देशाने तीक्ष्ण हत्याराने वार केला. यावेळी मदतीसाठी आलेले काका दिगंबर देवरे व आई हे जखमी झाले.
दुसर्या गटाच्या वतीने दत्तात्रेय उर्फ भय्या बाळू उलभगत-शेवतकर (34) यांनी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार नीलेश देवरे, नाना धांड्या उर्फ सिद्धार्थ देवरे, अंजली नीलेश देवरे, बेबीबाई राजू देवरे, दिगंबर देवरे यांनी मागील भांडणाचे कारण पुढे करून वाद घातला तसेच डोळ्यातील मिरची पूड फेकून खुरपणीने वार केला. यानंतर वसीम खान, वसीम शेख व शेवतकर यांची धिंड काढण्यात आली. तिघांच्या चेहर्यावर काळया रंगाचे कापड होते. पोलिस अधिकारी निवृत्ती पवार, उपनिरीक्षक राजश्री पाटील यांच्यासह हेडकॉन्स्टेबल तुषार जाधव, गौतम सपकाळे यांच्या पथकाने कारवाई केली.
बंदोबस्त आणि नजर घटनेनंतर परिसरात पोलिस बंदोबस्त देण्यात आला आहे. शिवाय गायकवाड चौक पोलिस चौकी या ठिकाणी पोलिस व्हॅन दिवसभर थांबून होती. तर परिसरातील सीसीटीव्हीवरूनही पोलिस नजर ठेवून आहे.