वरणगावकरांचा जल्लोष : नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी पोहोचले

24 तास पाणी मिळत नाही तो पर्यंत लढा सुरूच राहणार : माजी नगराध्यक्ष सुनील काळे


People of Varangaon rejoice : Water from the new water supply scheme has arrivedवरणगाव (13 जुलै 2025) : वरणगाव शहरवासीयांचा पाणीप्रश्न अखेर निकाली निघाला असून नवीन पाणीपुरवठा योजनेचे पाणी गावात पोहोचले आहे. गावात पाणी आल्यानंतर वरणगावकरांनी जल्लोष केला. व्हॉल्व्हमन योगेश धनगर यांचे महिलांनी औक्षण करून सत्कार केला. यावेळी बुंदी वाटून व जागोजागी फटाके फोडून आनंद व्यक्त करण्यात आला.

माजी नगराध्यक्षांच्या प्रयत्नांना यश
माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी नगराध्यक्ष असताना 19 सप्टेंबर 2019 रोजी 24 बाय 7 अशी 25 कोटींची पाणी योजना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अथक प्रयत्नांनी व मंत्री संजय सावकारे यांच्या सहकार्याने व कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांनी मंजूर करून आणली. या योजनेच्या पूर्णत्वासाठी अनेक अडथळे आले. ते जनआंदोलनाच्या माध्यमातून पार करीत नवीन पाणी योजनेचे पाणी वरणगाव शहरात सुरू झाले आहे.




फटाक्यांची आतषबाजी व सर्वत्र जल्लोष
भाजपा कार्यकर्त्यांनी फटक्यांची आतशबाजी करत बुंदी वाटून जागोजागी फटाके फोडून जल्लोष केला. यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे म्हणाले की. जोपर्यंत वरणगाव शहरात 24 तास पाणी मिळत नाही तो पर्यंत स्वस्थ बसणार नाही.

यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्ष सुनील काळे, भाजपा शहराध्यक्ष सुनील माळी, नाना चौधरी, अजमल खान, शामराव धनगर, उपनगराध्यक्ष शेख अखलाख, आकाश निमकर, कामगार नेते मिलिंद मेढे, नगरसेवक इरफान पिंजारी, ग्रामपंचायत सदस्य रुक्मिणी काळे, सरला गावंडेख सौभद्र बावणे, शालिग्राम डोळसे, योगेश माळी, मयूर शेळके, अ‍ॅड.ए.जी.जंजाळे, राहुल जंजाळे, फझल भाई, प्रकाश गव्हाळे, साबीर कुरेशी, डॉ.सादिक शेख, आवेश खान, बाबा खान, राजू चौधरी, राजू बोदडे, खलील कुरेशी, सुभाष महाजन, रामभाऊ माळी, संतोष पाटील, रमेश पालवे, सुरेश पालवे यांच्यासह असंख्य नागरिक उपस्थित होते.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !